कुणाच्या खिशात कितीच पाकीट पॅराग्लायडिंग देतोय मृत्यूची क्षासंगता,



प्रतिनिधी
अनमोल कांबळे

देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी येथील पर्यटकांना आकर्षित करणार व काही मिनिटात लाखो रुपये कमवून देणारा मौजे दांडेकर येथील सर्वे नंबर १०) हॉरिसन फोली थापा पॉइंट या ठिकाणचा पॅराग्लायडिंग सारखा जीवघेणा खेळ देतोय मृत्यूची क्षासंगता काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते इम्रान क्षिरसागर यांनी माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळवलेल्या माहितीनुसार एक गोष्ट निष्पन्न झाली की कुठल्याही प्रकारची या खेळाला स्थानिक प्रशासनाकडून परवानगी दिली गेले नाही तरीही राजरोसपणे पोलिसांच्या डोळ्यावरती पट्टी लावून पैशा करिता हा जीव घेणा खेळ चालू आहे हे इम्रान क्षिरसागर यांनी माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मीळलेल्या माहितीत निष्पन्न झाल्याची चित्र पाहायला मिळत आहे इतक्या मोठ्या जीवघेणा खेळामध्ये कुठल्याही स्थानिक प्रशासनाची अथवा ग्रामपंचायतीची अथवा मूळ मालकाची परवानगी नसल्याने व हा खेळ कुठल्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालू आहे, व स्थानिक पोलीस व तहसीलदार यांनी हाताची घडी आणि तोंडावरती बोट का ठेवले आहे, हे शहरातील व परिसरातील जागरूक नागरिकांना कळणासे झाले असल्याचे पाहायला मिळत आहे, या खेळामध्ये वाई पोलादपूर नॅशनल रोड वरती दिवसान दिवसा गाड्यांच्या अपघाताच्या घटना वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे परंतु पोलिसांकडून झालेल्या दुर्घटना दडपून या खेळावरची कुठल्याही प्रकारची बंदी येऊ नये व कमी वेळात लाखो रुपये कमवून देणारा हा जीवघेणा खेळ चालूच असावा अशी सांत्वन स्थानिक पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. व अशी चर्चा देखील संपूर्ण शहरांमध्ये चालू आहे, पोलीस प्रशासन व तहसीलदार या खेळा वरती कारवाई करणार की पुन्हा एकदा हाताची घडी आणि तोंडावरती बोट ठेवून शांत बसणार ते काही दिवसातच कळेल,