हेन्ड्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी निघालेल्या मोर्चाला पाचगणीत तुफान प्रतिसाद प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्या रंजन कांबळे अनमोल कांबळे अविष चव्हाण इम्रान शिरसागर संजय वने यांची तुफान भाषणे
पाचगणी प्रतिनिधी
देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणी शहरांमध्ये अनेक दिवसांपासून नागरिकांना पाण्याची टंचाई भासत होती याच भासलेल्या टंचाईच्या विरोधात जीवन प्राधिकरण विभागाच्या विरुद्ध कोणीही आवाज उठवायला तयार नव्हते मात्र माजी नगरसेवक मा.हेन्ड्री जोसेफ सिद्धार्थ नगर संघाचे अध्यक्ष मा.रंजन कांबळे सामाजिक कार्यकर्ते मा.अनमोल कांबळे युवा नेते मा.अविष चव्हाण उद्योजक मा.इम्रान शिरसागर मा.संजय वने यांच्या सारख्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जीवन प्रधिकरणाच्या विरोधात एल्गार पुकारला व या पुकारलेल्या एल्गारला यश आल्याचे चित्र पाहिला मिळत आहे प्रशासनाने आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याने व इथून पुढे पाचगणी शहराला पाणीटंचाई होणार नाही असे लेखी आश्वासन दिले असल्याने आंदोलकांनी आपले आंदोलन स्थगित केले आंदोलन हे विविध कारणांनी भाषणांनी चर्चेचा विषय राहिला हेन्ड्री जोसेफ म्हणाले हा राजकीय स्टंट नसून हा लोकांसाठी काढलेला येलगार आहे सामान्यांकडे जीवन प्राधिकरण विभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे लोकांना पाणी रात्री दोन वाजता का सोडता? सर्वसामान्य कष्टकरी हा रात्री दोन वाजता झोपलेला असतो मग पाणी धनदांडग्या साठी सोडता का? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला तर रंजन कांबळे म्हणाले पाणी धोम धरणातून आणा अथवा नागेवाडी धरणातून आणा परंतु आम्हाला पाणी द्या पाण्यापासून शहरातील नागरिक वंचित राहिल्यास प्रशासनाला याचे परिणाम भोगावे लागतील तर अनमोल कांबळे म्हणाले परिणामांची पर्वा करणारे आम्ही कार्यकर्ते नाही क्रांती घडवण्याची क्षमता ही विचारांमध्ये असते गर्दीमध्ये नसते आणि म्हणून जेव्हा जेव्हा या देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आंदोलने घडली आहेत तेव्हा तेव्हा या देशांमध्ये क्रांती घडली आहे आणि म्हणून प्रशासनाने इथून पुढे लोकांना पाणी वेळेत न दिल्यास प्रशासनाला याचे लोकशाही मार्गाने परिणाम भोगावे लागतील या व अशा अनेक विषयांवरती आंदोलकांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर व प्रशासनाने निवेदन मागण्या मान्य केल्याचे पत्र दिल्यानंतर दिनांक 20/2/2024 रोजीचे आंदोलन हे आज रोजी यशस्वीरित्या समाप्त झाले असे आंदोलकांकडून घोषित करण्यात आली,

