प्रतिनिधी अनमोल कांबळे
अखेर पाचगणी येथील टेबल लँड विकसित करण्याकरिता केंद्र शासनाकडून अमृत योजनेच्या माध्यमातून 4 कोटी 66 लाख रुपयाचा निधी मंजूर पाचगणी करांकडून नगरपालिका प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन.
देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आशिया खंडातील दोन नंबरचे पठार मानले जाणाऱ्या पाचगणी येथील टेबल लँड वरील ऐतिहासिक पाणीसाठा तळवीचे सुशोभीकरण करण्याकरिता केंद्र शासनाच्या अमृत योजनेच्या माध्यमातून 4 कोटी 66 लाख रुपयांचा निधी केंद्र सचिव कार्यालयाच्या माध्यमातून मंजूर झाला असून या निधीच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामाचा लाभ हा थेट पर्यटना मध्ये भर घालणारा होणार असून याचा सर्वस्व फायदा हा पाचगणी येथील स्थानिक भूमिपुत्रांन सह पर्यटनाला होणार असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे, पाचगणी नगरपालिका प्रशासनाकडून कारभार हातात घेतल्यापासून पाचगणी शहरांमध्ये विविध ठिकाणी विकास कामांचा डोंगर उभा राहिला आहे, त्याचप्रमाणे टेबल लँड वरील जांभळा दगड रोड पार्किंग चे काम असो अथवा सिडनी पॉइंट येथे विविध आकर्षित स्टॅच्यू असो याचा फायदा मात्र पर्यटकांना होत असल्याचे दिसून आले आहे, त्यातच आता अमृत योजनेच्या माध्यमातून केंद्र सचिव कार्यालयाकडून मंजूर झालेल्या 4 कोटी 66 लाख रुपयांच्या निधीच्या माध्यमातून होणाऱ्या ऐतिहासिक तळवीच्या सुशोभीकरणामुळे पाचगणी करांच्या उत्पन्नासह पर्यटनाला याचा चांगलाच फायदा मिळणार असल्याचे पर्यटन विचारवंतांच्या माध्यमातून सांगण्यात येत असून नगरपालिका प्रशासनाने कागदोपत्री केलेल्या पाठपुराव्याचे देखील पाचगणी करांच्यावतीने कौतुक होत असून हजारो वर्षाचा रखडलेला विकास आता नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लागणार असल्याने नगरपालिका प्रशासक यांच्यासह संपूर्ण नगरपालिका कर्मचारी वर्गाचे देखील पाचगणी करांकडून अभिनंदन करण्यात येत असल्याचे शहरामध्ये दिसून आले आहे.,

