प्रतिनिधी पांचगणी
पांचगणी येथील निवेरा शाळेचा पाकिस्तानशी कुठलाही संबंध नाहीं? मग नाव न बदलण्याकरिता व चौकशी न होण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाचे शाळेने दरवाजे का ठोठावले ? याचे उत्तर प्रशासनाने आम्हाला दयावे अनमोल कांबळे.
पांचगणी येथील सर्वे नंबर 128/ मध्ये पाकिस्तान ब्रह्मदेश अशा नावाने सातबार्या वरती नोंद असून या संदर्भात जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या गेल्या होत्या परंतु त्या तक्रारींच्या अनुषंगाने तहसीलदार महाबळेश्वर तेजस्विनी पाटील यांच्यासमोर सुनावणी आयोजित केली गेली होती त्या संदर्भात शाळेकडून शाळा रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र संस्था चालकांची यादी व इतरही कागदपत्रे तहसीलदार यांनी सुनावणी वेळी मागून घेतली गेली होती व शाळेने ती अद्याप उपलब्ध करून दिली गेली नाहीत व त्याच प्रकारे तक्रारदार अनमोल कांबळे यांना देखील या सुनावणी दरम्यान बोलवण्यात आले होते परंतु दिनांक 27/8/2024 रोजी अनमोल कांबळे हे हजर झाल्यानंतर व सुनावणी पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार महाबळेश्वर यांच्यासमोर सुनावणी करण्यात आली व सुनावणी पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी मंडलाधिकारी पाचगणी यांना पत्रक काढून सातबार्या वरील पाकिस्तान नाव हटवण्याकरिता सांगितले होते, व पुढील सुनावणी वेळी निवेरा शाळेने आपली सर्व कागदपत्रे घेऊन हजर राहण्याकरिता दिनांक 30/8/2024 रोजी तहसीलदार महाबळेश्वर तेजस्विनी पाटील यांनी सांगितले होते परंतु आज रोजी सोनावणी सुरू होताच निवेरा शाळेमार्फत आलेल्या वकिलांनी सांगितले आम्ही आती तातडी मुंबई उच्च न्यायालयासमोर हजर राहून कुठल्याही प्रकारची संस्थेची अथवा सातबार्या वरती कागदपत्रांची चौकशी अथवा कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात येऊ नये असे निवेरा शाळेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचा दिनांक 10 /9/2024 रोजी पर्यंतचा मनाई हुकूम आदेश प्राप्त करून आणला आहे, हे निवेरा शाळेच्या वकिलांमार्फत आज रोजी सांगण्यात आले व त्याची एक प्रत मूळ तक्रारदार अनमोल कांबळे तसेच तहसीलदार तेजस्विनी पाटील महाबळेश्वर यांना देण्यात आली त्यानंतर तहसीलदार तेजस्विनी पाटील म्हणाल्या आता आपली सुनावणी थेट 17/9/2024 रोजी ठेवण्यात येत आहे, व मेहरबान न्यायालयाचे पुढील आदेश आल्यानंतर पुढील सुनावणी आपण घेऊ असे सांगण्यात आले आहे, त्यानंतर अनमोल कांबळे बाहेर आल्यानंतर म्हणाले सातारा जिल्हा प्रशासनातील उपजिल्हाधिकारी नागेश पाटील सांगत होते की पाचगणी येथील निवेरा शाळेचा पाकिस्तान अथवा इतर देशांशी कुठलाही संबंध नाही अथवा संस्थाचालक इतर देशातले नसू शकतात असे समाजाच्या वतीने मला सांगण्यात येत होते परंतु जर का शाळेचा अथवा संस्थेचा अथवा संस्था चालकांचा पाकिस्तानशी व इतर देशांशी कुठलाही संबंध नाही काही संस्थाचालक हे बाहेर देशातील नाहीत हे जर का खरं आहे तर मग पाकिस्तान नाव न हटवण्याकरिता इतर चौकशी न होण्याकरिता निवेरा शाळा मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे का ठोकवत आहे ? याचे उत्तर आम्हाला जिल्हा प्रशासनाने द्यावे, एकीकडे तुम्ही सांगता की कुठलाही संबंध नाही तर दुसरीकडे शाळा अशा प्रकारे चौकशी पासून लांब पळत असण्याचे चित्रा आम्हाला पाहायला मिळत आहे याचे उत्तर प्रशासनाने आम्हाला द्यावे, माझे संभाषण मंडल अधिकारी यांनी कुठल्या त्या देशातील गद्दार अधिकाऱ्याला पाठवले याचे उत्तर आम्हाला प्रशासनाने द्यावे तो पाकिस्तानचा हस्तक सातारा प्रशासनामध्ये कुठला अधिकारी आहे याचे उत्तर आम्हाला सातारा जिल्हा प्रशासनाने द्यावे या संपूर्ण प्रकरणाची एटीएस चौकशी करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पत्र एटीएस विभागाला लिहावे व या भारत देशात दुश्मन पाकिस्तानी देशाची हिरव्या रंगाची वाढणारी कीड ठेचून काढावी आणि नंतर पत्रकारांना बातम्या छापण्यापासून रोखावे या प्रकरणामुळे माझ्याही जीवाला धोका निर्माण झालेला आहे माझ्याही सुरक्षितेची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी असे अनमोल कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


