पांचगणी येथील सर्वे नंबर १२८/मधील पाकिस्तान प्रकरणांमध्ये जिल्हा प्रशासनाची धावाधाव तहसीलदारांचा निकाल लागायच्या अगोदरच प्रशासनाच भाकीत संस्थाचालकांचा पाकिस्तानशी कुठलाही संबंध नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा सीबीआय अथवा आंतरराष्ट्रीय दहशतवादी विरोधी पथकाकडून या प्रकरणाची चौकशी होणार की नाही? याकडे जिल्ह्याचे लक्ष.



प्रतिनिधी पांचगणी

पाचगणी येथील सर्वे नंबर १२८/मधील पाकिस्तान प्रकरणांमध्ये जिल्हा प्रशासनाची धावाधाव तहसीलदारांचा निकाल लागायच्या अगोदरच प्रशासनाच भाकीत संस्थाचालकांचा पाकिस्तानशी कुठलाही संबंध नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा सीबीआय अथवा आंतरराष्ट्रीय दहशतवादी विरोधी पथकाकडून या प्रकरणाची चौकशी होणार की नाही? याकडे जिल्ह्याचे लक्ष.

पांचगणी येथील सर्वे नंबर १२८/ मध्ये पाकिस्तान नावाचा उल्लेख असल्याने दिनांक 13/8/2024 रोजी सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते व त्या निवेदनात म्हटले होते की येत्या आठ दिवसांमध्ये सातबार्या वरील पाकिस्तान नाव हटवा व संस्थाचालकांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहेत का? याची चौकशी करा परंतु आज रोजी अनमोल कांबळे म्हणाले वीस दिवस होऊन गेले तरी सातारा महसूल विभागाने सातबार्या वरील पाकिस्तान नाव हे अद्याप हठवले नसल्याचे दिसून येत आहे, व या संदर्भात गपचूप तक्रारदाराचे म्हणणे न घेता परस्पर हेरिंग देखील महसूल विभागाने ठेवून संबंधित संस्थाचालकांचे म्हणणे ऐकून घेतले जात होते परंतु तक्रारदार अनमोल कांबळे यांना ही बात कळताच अनमोल कांबळे यांनी दिनांक २०/८/२०२४ रोजी तहसीलदार महाबळेश्वर यांना पत्र देऊन माझेही म्हणणे या विषयांमध्ये ऐकून घ्या असे कळवले होते त्यानंतर तहसीलदार महाबळेश्वर यांनी दिनांक २१/८/२०२४ रोजी या संदर्भातली सुनावणी ठेवली होती व सुनावणी आज रोजी संपन्न झाली असून पुढील तारीख 30/ असल्याने तहसीलदार यांनी तक्रारदाराला सांगितले की आम्ही तुम्हाला काही वेळातच पत्र देतो व नाव काढण्याचे आदेश या क्षणाला जाहीर करतो परंतु अद्याप कुठलेही पत्र तक्रारदार यांना भेटले नसून या सर्व प्रकरणाच्या एक दिवस अगोदर दिनांक २६/८/२०२४ रोजी‌ सातारा जिल्हा प्रशासन सांगते की या प्रकरणांमध्ये पाकिस्तान व ब्रह्मदेश संस्थेचा पाकिस्तानशी कसलाही संबंध नाही हे डिक्लेअर केले असल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यातील लोकांच्या मनामध्ये संशयाची पाल ओरडायला सुरू झाली आहे, तहसीलदार महाबळेश्वर यांच्यासमोर चाललेली तारीख संपायच्या अगोदरच जिल्हा प्रशासनाने हे भागीत केले असून आता पोलिसांची अथवा आंतरराष्ट्रीय दहशतवादी विरोधी पथकाची गरज इथून पुढे या प्रकरणांमध्ये लागणार की नाही? असा असणारा प्रश्न उपस्थित झाला आहे परंतु तक्रारदार यांनी सांगितले आहे की आमची लढाई ही क्रांतिकारक लढाई आहे आम्ही आमच्यासाठी लढत नसून दुश्मन देशाचे नाव हे सातबार्या वरून हटवण्याकरिता लढत आहोत महाबळेश्वर तहसीलदार यांच्यासमोर सुरू असलेली तारीख संपायच्या आत जिल्हा प्रशासन भागीत करू शकतात की संस्थाचालकांचा पाकिस्तानशी कसलाही संबंध नाही परंतु सातबार्या वरचे पाकिस्तान नाव हटवू शकत नाहीत हे इथे असणारे दुर्दैव आहे, एकीकडे जिल्हा प्रशासन सांगते की नजर चुकीने नाव लागले मग २०१९ ला ज्यावेळेस आत्ताचे महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयात कार्यरत असणारे ढगे हे पाचगणीचे मंडल अधिकारी होते व त्यावेळेस त्यांच्या कार्य काळामध्ये या सातबार्या वरती फेर दुरुस्ती करण्यात आली त्यावेळेस ते मंडल अधिकारी होते ते भांग पिले होते का? त्यांच्या निदर्शनास ही पाकिस्तानी ‌बाब आली नाही का? याचे उत्तर सातारा जिल्हा प्रशासनाने आम्हाला द्यावे त्याच प्रकारे महसूल विभागाच्या दप्तरी संस्थाचालकांचे पाकिस्तान कनेक्शन नसू शकते परंतु आंतरराष्ट्रीय पथकांनी‌ या प्रकरणाची चौकशी करावी आणि संबंधित संस्थाचालक दोषी आढळल्यास कारवाई करावी त्याच प्रकारे माझे संभाषण पाचगणीचे मंडल अधिकारी यांनी कुणाला पाठवले तो वरिष्ठ अधिकारी कोण याचीही चौकशी जिल्हा प्रशासनाने करावी त्याच प्रकारे एका मुजरा वीर पत्रकाराने माझ्याकडून गोळा केलेली माहिती कुणाकुणाला पाठवली याचीही चौकशी करण्यात यावी असे अनमोल कांबळे यांनी सांगितले.