पाचगणी खिंगर पंचक्रोशी मध्ये महसूल प्रशासन ऍक्टिव्ह मोड मध्ये तलाठ्यांच्या अनाधिकृत बांधकामांसह उत्खनन केलेल्या जागेंना भेटी रात्रीच्या अंधारात होणाऱ्या वृक्षतोडीचेही पंचनामे सुरू.
प्रतिनिधी अनमोल कांबळे
पाचगणी खिंगर परिसरामध्ये रविवारचे औचित्य साधून रात्रीच्या अंधारात सिल्वर ओक झाडांच्या केलेल्या वृक्षतोडी संदर्भात तलाठी कार्यालयात तक्रारी दाखल झाल्यानंतर तलाठ्यांनी थेट पंचनाम्याची मोहीम हातात घेतली असून चक्क गाव कामगार तलाठी हे अनाधिकृत बांधकाम करत वृक्षतोड करणाऱ्या जागेवरती भेटी देऊ लागल्याने पंचनामे करताना दिसून आले , खिंगर गावचे गाव कामगार तलाठी सुदाम मामीलावाढ यांनी सांगितले कार्यालयात तक्रारी दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने अनधिकृत बांधकामांचे व वृक्षतोडीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे, व पंचनामे करून आम्ही पुढील कार्यवाही करीता वरिष्ठ कार्यालयात पंचनामे पाठवणार आहोत त्या पंचनाम्यांन वरती वरिष्ठ योग्य ती कारवाई करतील अशा प्रकारे तलाठी यांच्याकडून सांगण्यात आले असून तलाठ्यांना पाहून मात्र धनदांडग्यांन सह स्थानिक एजंटांची चांगलीच धावपळ उडाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

