पाचगणी
प्रतिनिधी.
पाचगणी महाबळेश्वर मुख्य रस्त्यावरील शासनाची दिशाभूल करून केवळ कागदोपत्री घेतलेल्या परवानगीचा भंग केलेल्या इमारतीचा पंचनामा करण्याकरिता अर्ज दिला असता राजकीय दबावापोटी व आर्थिक तर जोडी मुळे तलाठी व सर्कल बेकायदेशीर इमारतीचा पंचनामा करण्यात टाळा टाळ करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे इको सेन्सिटिव्ह नियमांचा भंग केला असल्याचे चित्र दिसून येत आहे जमिनी पासून वरच्या बाजूस इमारत असली पाहिजे परंतु ही इमारत जमिनीपासून खाली खोल दरी बाजूस तीन मजले उभे असल्याचे भयानक वास्तव आता समोर यायला लागले आहे यासंदर्भात विविध शासकीय कार्यालयात तक्रारी अर्ज केला असल्याने योग्य ती कारवाई चालू आहे परंतु तलाठी व सर्कल जे हे या नियमांचा भंग करत असताना या धन दांडग्यांना मदत करत होते तेच आता यांचा फेरपंचनामा करण्याकरिता टाळा टाळ करत असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि म्हणून या प्रकरणांमध्ये स्वतः तहसीलदारांनी लक्ष घालून या बेकायदेशीर आणि शासनाची दिशाभूल करणाऱ्या इमारतीचा पंचनामा केला पाहिजे त्याला योग्य तो दंड आकारला पाहिजे व असे न झाल्यास व या इमारतीचा पंचनामा करण्यास टाळाटाळ केल्यास तलाठी कार्यालयासमोर आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला जागे करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
अनमोल कांबळे

