पाचगणी महात्मा फुले यांना अभिवादन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त पाचगणी परिसरातील जयंती उत्सव मंडळाच्या वतीने कार्यक्रम पत्रिकाजाहीर
April 11, 2022 | महाबळेश्वर
पाचगणी प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून पाचगणी परिसरातील दि 14/4/2022 रोजीच्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली यावेळी मान्यवरांचे महात्मा फुले यांच्या जीवनावरती प्रबोधन व व्याख्यान करण्यात आले त्याच प्रकारे अवघ्या दोन-तीन दिवसांन वरती घेऊन ठेपलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले या वेळेस पाचगणी जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील बगाडे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजू काकडे दलित संघटनांचे पदाधिकारी अक्षय गायकवाड अनमोल कांबळे अमित मोरे दीपक कांबळे यावेळी उपस्थित होते जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील बागडे यांनी पाचगणी व पाचगणी परिसरातील विविध मंडळांना संबोधित केले संबोधित करत असताना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण दोन वर्षानंतर न साजरी करत आहोत म्हणून याची दक्षता प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्याने घेतली पाहिजे जयंती ही उत्साहाने साजरी करा शासनाला सहकार्य करा असे पाचगणी जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील बागडे यांनी पाचगणी परिसरातील मंडळांना सांगितले व पाचगणी शहर व परिसरात महामानवाला वंदन करण्याकरिता भरगच्च कार्यक्रम जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजितकरण्यात येणार आहेत अशी माहिती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री सुनील बगाडे यांनी दिली.दिनांक ११-४-2022 पासून १९-४-2022 पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये दिनांक १३-४-२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता पाचगणी व परिसरातील सर्व भीमअनुयायी महाड चवदार तळ्याकडे भीमज्योत आणण्यासाठी प्रस्थान करतील दिनांक १४-४-२०२२ रोजी पाचगणी शहरातील विविध ठिकाणी भीमज्योतीनचे स्वागत. व्याख्यान.अल्पोपहार.छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण.सायंकाळी बेल एअर हॉस्पिटल पाचगणी क्लब मार्गे भव्य मिरवणूक व पाचगणी परिसरातील विविध मंडळांचे स्वागत.दिनांक १५-४-२०२२ रोजी सिद्धार्थ नगर .भीमनगर व सम्राट अशोक नगर येथे लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम वकृत्व स्पर्धा व सामुदायिक अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दिनांक १६-४-२०२२रोजी भीमनगर येथे सामुदायिक अन्नदान व प्रबोधनपर भीमगीतांचा सदाबहार कार्यक्रम दिनांक १७-४-२०२२रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर हॊसिंग सोसायटी येथे अन्नदान लहानमुलांचे कार्यक्रम दिनांक १९-४-२०२२ रोजी गाथा महामानवाची भीमसंगीतांचा कार्यक्रम कै. भाऊसाहेब भिलारे स्टेडियम पाचगणी येथे होणार आहे असे देखील सांगण्यात आले
Categories: महाबळेश्वर
Related Posts
पाचगणीचे पोलीस निरीक्षक सतीश पवार साहेबां मुळे पाचगणीतील गुन्हेगारीला आवक बसली वेळ आल्यास साहेबांच्या समर्थनार्थ रोड वरती उतरू अनमोल कांबळे .
March 28, 2022
पाचगणी शहराचे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्यावरती जे दोन दिवसांन पासून जे आरोप चालू आहेत कि ते तक्रार दाखल करून…
पाचगणीचे सौंदर्य उध्वस्त होत असताना पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची हाताची घडी आणि दिल्ली दरबारची तोंडा वरती पट्टी असल्याने दापकेकरांची पाचगणी शहरातून हकालपट्टी करा- अनमोल कांबळे
April 26, 2022
*वाचा सविस्तर बातमी लढा महाराष्ट्राचा मध्ये* *पाचगणी प्रतिनिधी* निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणीमध्ये मुख्य बाजारपेठेतील मज्जित च्या…
