पाचगणी प्रतिनिधी.
अनमोल कांबळे
पावसाळा चालू होताच सर्वत्र शासन हे आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून दरड दगड कोसळून जीवघेणी हानी टाळत असल्याने सर्वत्रच काळजी घेत आहेत परंतु या शासनाच्या नियमांना आपल्या पायथ्याडाने लाथाडून सातारा नगररचना बांधकाम विभागाची दिशाभूल करून बेकायदेशीर चुकीचे बांधकाम परवाने मिळवणारा पाचगणीतील आर्किटेक च्या नावाखाली इकोसिन्सिटी झोनच्या नियमांच्या चिंध्या करणारा प्रसाद कारंजकर यांनी आपल्या युक्तीचा आणि पैशाचा वापर करून अधिकाऱ्यांच्या संगनमताने अधिकाऱ्यांची दिशाभूल करून पाचगणी शहरांमध्ये असे अनेक बांधकाम मंजुरी या बांधकाम विभाग सातारा यांच्या माध्यमातून आणल्या परंतु ज्या प्रकारे ज्या नियमानुसार मंजुर्या देण्यात आल्या त्या पद्धतीत एकही बांधकाम या आर्किटेक आणि बिल्डरच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले नाही केवळ या नियमांचा भंग करण्यात आला आहे आणि आता इतकंच काय तर गेल्या वेळेस पावसाळा चालू होताच ज्या ठिकाणी दगड कोसळली होती त्याच ठिकाणी पुन्हा एकदा पाचगणीतील प्रसिद्ध टेबल लँड चा मागचा भाग पोखरून व दगड ढिल्लं करण्याचे काम चालू आहे आणि त्याच टेबल लँड च्या खालच्या बाजूला राहत असलेल्या हजारो लोकांचे पैशाकरिता जीव घेण्याचा प्रकार हा शासनाची दिशाभूल करणारा आर्किटेक करत असल्याचे चित्र समोर आले आहे आता या संपूर्ण प्रकरणा वरती मुख्याधिकारी कारवाई करणार??? की पुन्हा एकदा फायनल प्लॉट नंबर 312/ मध्ये ज्याप्रकारे पाकीट घेऊन शांत बसण्याचे काम केले त्याच प्रमाणे या ठिकाणी देखील शांत बसण्याचे काम करणार का???? असा असणारा प्रश्न पाचगणी करांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे ज्यांनी पाकीट नाही दिलं त्यांच्या बांधकामांवरती गुन्हे दाखल केले आणि ज्यांनी पाकीट दिली त्यांना मात्र पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी आश्रय दिला हे पाचगणी नगरपालिकेमध्ये राबवत असलेल्या शासन धोरणाचे खरे वास्तव आहे.

