पाचगणी येथील तलाठी कार्यालयाचे सुशोभीकरण करणारा तो माफिया कोण याचे स्पष्टीकरण बांधकाम विभागाने व तहसीलदार कार्यालयाने द्यावे अनमोल कांबळे,
August 27, 2023 | महाबळेश्वर
पाचगणी येथील तलाठी कार्यालयाचे सुशोभीकरण करणारा तो माफिया कोण याचे स्पष्टीकरण बांधकाम विभागाने व तहसीलदार कार्यालयाने द्यावे अनमोल कांबळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी
मौजे पाचगणी येथील बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे जे तलाठी कार्यालय आहे व त्या कार्यालयाचे ज्याप्रकारे अचानकपणे भरभराटीचे सुशोभीकरण झालेले दिसत आहे व लाखो रुपयांच्या भेटवस्तू या तलाठी कार्यालयामध्ये अचानक रित्या उपलब्ध होत आहेत हे का? आणि कशासाठी कोण देत आहे याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी एकीकडे घोडा व्यवसायिक असणाऱ्या निलेश मोरे सारख्या गरीब कष्टकऱ्याचा घोडा मरतो परंतु शासनाला त्याला आपत्कालीन निधी देण्याकरिता पैसे उपलब्ध नसतात परंतु, पाचगणी व पाचगणी परिसरात फोफावलेल्या एजंट गीरी आणि दलालीच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात काळी माया गोळा करणाऱ्या ठेकेदारांना आणि दलालांना पाठीशी घालण्यासाठी तलाठी कार्यालयाचे सुशोभीकरण झालेल आहे, पर्यावरणाची हत्या करण्याची आणि माळीन सारखी परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण करण्याची जनू सुपारीच या तलाठी कार्यालयामध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे की काय? अशी शंका आता मनामध्ये या लागलेली आहे, हे तर असे झाले आहे की हम तुम्हे पैसा देंगे आलिशान ऑफिस बांद कर देंगे और तुम मुपर हाथ और आखो पर पट्टी बांद कर बेट जाना, असा जणू आदेश या लँड माफीया यांनी काढला आहे की काय असे आता वाटायला लागले आहे महाबळेश्वरच्या नवनिर्वाचित तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील या लक्ष न देत नसल्यामुळेच की काय? हाताखालच्या अधिकारी हे दलाला मदत करत त्यांच्याकडून आर्थिक लाभ घेत असल्याचे चित्र आम्हाला पाहायला भेटत आहे, भविष्यामध्ये ही परिस्थिती थांबली नाही तर तहसीलदारांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवत बेकायदेशीर कार्यालयाचे व अधिकाऱ्यांचे जे सुशोभीकरण चालू आहे त्याच्या निषेधार्थ पाचगणीतील लँड माफिया धनदांडग्यांना मदत करणाऱ्या कार्यालयाच्या बाहेर आम्हाला आंदोलन करावे लागेल, व आम्ही केलेले आरोप खोटे असल्यास महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांनी स्पष्टीकरण द्यावे, की कार्यालयाचे सुशोभीकरण आणि कार्यालयांना लाखो रुपयांच्या भेटणाऱ्या भेटवस्तू या शासन देत आहे हे त्यांनी स्पष्ट करावे असे अनमोल कांबळे यांनी सांगितले,
Categories: महाबळेश्वर
Related Posts
पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला आदर्श वंत अधिकारी मिळाले कर्मचाऱ्यांसह पाचगणी करांकडून निखिल जाधव यांच्या कामाचे कौतुक
August 27, 2023
पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला आदर्श वंत अधिकारी मिळाले कर्मचाऱ्यांसह पाचगणी करांकडून निखिल जाधव यांच्या कामाचे कौतुक…
आंब्रळ ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार समोर आणणार असल्याच्या भीतीमुळे सरपंच आणि सदस्यांचे माझ्याविरुद्ध षडयंत्र उमेश जाधव उपसरपंच..
August 29, 2023
आंब्रळ ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार समोर आणणार असल्याच्या भीतीमुळे सरपंच आणि सदस्यांचे माझ्याविरुद्ध षडयंत्र उमेश जाधव उपसरपंच.. प्रतिनिधीअनमोल कांबळे आंब्रळ गावचा…
