पाचगणी नगरपालिकेकडून पाचगणी एसटी स्टँडवरील होल्डिंग हटवण्याची मोहीम सुरू मात्र यूपीच्या धनिया भंगारवाल्यांकडून महामंडळाच्या लाखो रुपयांच्या लोकांडा वरती डल्ला महामंडळ भंगारवाल्या वरती गुन्हा दाखल करणार का..?



पाचगणी नगरपालिकेकडून पाचगणी एसटी स्टँडवरील होल्डिंग हटवण्याची मोहीम सुरू मात्र यूपीच्या धनिया भंगारवाल्यांकडून महामंडळाच्या लाखो रुपयांच्या लोकांडा वरती डल्ला महामंडळ भंगारवाल्या वरती गुन्हा दाखल करणार का..?

पाचगणी प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी होर्डिंग मुळे मुंबईसह महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना मुंबई येथे घडली होती त्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासन स्तरावरती होर्डिंग हटवण्याची मोहीम जोरात सुरू होती त्याच पार्श्वभूमी वरती पाचगणी नगरपरिषदेने परिसरातील धोकादायक होर्डिंग हटवण्याची मोहीम मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या आदेशानंतर शहरांमध्ये राबवलेली असल्याचे दिसून येत आहे, मात्र त्याच अनुषंगाने आज सकाळपासूनच पाचगणी एसटी स्टँड परिसरामध्ये बेकायदेशीर होर्डिंग हटवण्याची मोहीम जोरात कार्यरत असल्याचे चित्र आज शहरांमध्ये पाहायला मिळाले परंतु त्यास पार्श्वभूमी वरती एसटी महामंडळाच्या अतेरित मध्ये असणाऱ्या विनापरवाना होर्डिंग वरती पाचगणी नगरपालिकेने हातोडा उचलल्यानंतर एसटी महामंडळाच्या होर्डिंग वरती पाचगणी नगरपालिकेच्या शेजारी असलेल्या यूपीच्या धनिया भंगारवाल्याचे दुकान डल्ला मारत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पाचगणी नगरपालिकेमध्ये होर्डिंग उध्वस्त करून आणल्यानंतर लाखो रुपयांचे आणलेले लोखंड अचानकपणे नगरपालिकेच्या शेजारीच बेकायदेशीर रोड वरती उघडलेल्या धनिया भंगारवाल्याच्या दुकानांमध्ये दिसले असल्याने शहरातील नागरिकांचे डोळे उंचावले आहेत जे लोखंड एसटी महामंडळाच्या हक्काचे आहे व त्यांच्या अत्तरीमध्ये आहे ते लाखो रुपयांचे लोखंड अचानकपणे धनिया भंगारवाल्याच्या दुकानांमध्ये कसं काय उपलब्ध झाले एसटी महामंडळाने लोखंड जर का भंगारवाल्याला विकले असल्यास रीतसर त्याचा लिलाव काढणं अपेक्षित होतं परंतु असं कुठलंही धोरण न राबवता परस्पर धनिया भंगारवाल्याच्या दुकानांमध्ये हे लोखंड दिसल्याने लाखो रुपयांच्या भंगाराची मलई नक्की रात्रीच्या अंधारात खातोय तरी कोण ? असा असणारा प्रश्न उपस्थित झाला नगरपालिकेच्या दारामध्ये केवळ नावाला किरकोळ साधे पत्रे व दहा ते पंधरा अँगल चे तुकडे नगरपालिका परिसरामध्ये ठेवून लाखो रुपयाचे मोठे लोखंडी गंज मोठ मोठे अँगल 40 ते 50 फुटी लोखंडी रॉड लोखंडी गंज हे सर्व भंगार दुनिया भंगारवाल्याकडे उपलब्ध झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून याच्या मागची मलय नक्की खातय तरी कोण एसटी महामंडळ धनिया भंगारवाल्या ची चौकशी करून गुन्हा दाखल करणार का ? की पुन्हा एकदा यूपीच्या धनिया भंगारवाल्याला अभय देणार यातील मोठे मासे घावणार ? की पुन्हा एकदा लाखो रुपयांच्या एसटी महामंडळाच्या भंगार वरती डल्ला मारायला यशस्वी होणार हे बघणं गंभीर्याचे ठरणार आहे..,