पाचगणी प्रतिनिधी
मौजे पाचगणी येथील फायनल प्लॉट नंबर 527/ च्या आत मध्ये दडलय तरी काय ? मुख्याधिकारी गिरीश दापकेकर याच्या वरती कारवाई करणार कि ? पुन्हा एकदा आश्रय देणार? असा प्रश्न अनमोल कांबळे यांनी उपस्थित केला आहे नगररचना बांधकाम विभागाच्या परवानगी केवळ नावाकरिता घ्यायच्या आणि त्या मिळवल्यानंतर त्यांचा भंग करायचा हे ध्येय आता पाचगणी तील लोकप्रतिनिधी वापरायला लागले असून नियमांवरती विश्वास ठेवायचा की नाही ? असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला आहे अनेक वर्षांपासून फायनल प्लॉट नंबर 527/मध्ये शासकीय नियमांचा अभंग करून चालू असणारे धोकादायक बांधकाम हे पाचगणी नगरपालिकेतील तत्कालीन सत्ताधारी यांचा धोका ओळखून बंद ठेवले होते परंतु सत्ताधारी पायउतार झाले आणि संपूर्ण कारभार हा प्रशासनाच्या हाती गेल्यानंतर पाचगणी नगरपालिकेतील एका माजी नगरसेविकेने पैशाच्या ताकतीवरती आपली युक्ती वापरून अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमांचे कागदी घोडे दाखवून पुन्हा एकदा बेकायदेशीर आणि पाचगणीच्या सौंदर्याला डाग लावण्याचे काम केले असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि म्हणून आज दिनांक 17/8/2022/ रोजी आम्ही पाचगणी नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकाऱ्यांकडे या विषयाची तक्रार केलेली आहे आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर हे या धनदांडग्यांना पाठीशी न घालता कारवाईचा भडगा उभारतील आम्हाला विश्वास आहे कारण ज्या प्रकारे पाचगणी नगरपालिकेची जागा हडपून स्वतःचा व्यवसाय चालू करणारा हॉटेल नमस्ते पुरोहित याच्याकडून ज्या प्रकारे पाचगणी नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना दर महिन्याला हप्ते चालू आहेत त्या प्रकारे यांच्या कडून देखील बेकायदेशीर हॉटेल उभारल्यानंतर हप्ते चालू करून घेणार नाहीत असा विश्वास आम्हाला आहे आणि आम्ही ही बेकायदेशीर इमारत ही अधिकाऱ्यांच्या सहकार्याने उभारू देणार नाही कारण पाचगणीचे सौंदर्य हे जपले गेले पाहिजे म्हणून तात्काळ नियमांचा भंग केल्याप्रकरणी संबंधित मालकावरती नगरपालिके मार्फत कारवाई झाली पाहिजे तात्काळ शनिवार रविवार उत्खनन केल्याप्रकरणी संबंधित जागेचा पंचनामा झाला पाहिजे संबंधित जागेमध्ये खोदण्यात आलेल्या विहिरीचा पंचनामा झाला पाहिजे आणि संबंधिता वरती कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे असे न झाल्यास संबंधिता विरोधात व नगरपालिकेच्या धोरणा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असे अनमोल कांबळे यांनी सांगितले

