दिनांक 17 मे च्या पाचगणी न्युज च्या खोट्या बातमीचा कासवंड ग्रामस्थांन कडून जाहीर निषेध..निषेध… निषेध….



पाचगणी प्रतिनिधी….
दिनांक 21- 5 – 2023..

मौजे- कासवंड ता -महाबळेश्वर जि- सातारा. दिनांक 17 मे 2023 रोजी पाचगणी न्युज या माध्यमातून कासवंड गावात पाण्यासाठी महिलांचा टाहो व सरपंच ग्रामसेवक प्रशासकीय यांचे दुर्लक्ष अशी बातमी प्रसारित करण्यात आली होती त्या बातमीचा प्रथमतः ग्रामस्थ सरपंच ग्रामपंचायत सदस्य महिला युवक यांनी आज सकाळी एकत्रित येत निषेध नोंदवला आहे व खुलासा देखील केलेला आहे
कासवंड गाव हे सधन शेतीप्रधान, उच्चशिक्षित तरुण तरुणी, राष्ट्रपती पदक,शेतकरी पुरस्कार. युवा उद्योजक, असे अनेक असंख्य पुरस्कार प्राप्त वारकरी संप्रदायाचे गाव आहे. स्ट्रॉबेरी, मलबेरी,गहू,नाचणी, फळभाज्या, पालेभाज्या,अशी पिके पावसाच्या पाण्याच्या व्यतिरिक्त आजही मे महिन्यात घेतली जातात कासवंड गावची जमीन ही पाण्याची जागा आहे शिवाय गावात स्थानिक लोकांच्या लोकसंखेच्या 70 टक्के स्वतःच्या विहिरी आहेत ज्यांना बारमाही पाणी आहे कासवंड गावाच्या इतिहासात आज अखेरपर्यंत गावाला कधीही टँकर सुद्धा आणला गेला नाही. गाव म्हणजे फक्त गाव नव्हे तर इतर वाडी वस्त्यांची सुद्धा अशीच पाण्याच्या बाबतीत उत्तम परिस्थिती आहे हिरवेवाडी इथं फक्त स्वतंत्र पाण्याची व्यवस्था नव्हती त्यावेळी सुद्धा गावच्या विहिरीतून पाण्याचा पुरवठा केला जात होता त्या नंतर महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र आमच्या सर्वांचे नेते आदरणीय राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या माध्यमातून स्वतंत्र बोरवेल प्रस्ताव मंजूर करून आणण्यात आला त्यानंतर जागेचा प्रश्न निर्माण झाला माजी सरपंच रवींद्र गोळे यांनीही खूप प्रयत्न केले परंतु जागेचा प्रश्न होताच मग निलेश गोळे ह्यांनी स्वतःची जागा लोकांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवा म्हणून बोरवेल करिता मा.ग्रामसेवक विजय राजपुरे व कासवंड गावचे मा. सरपंच जनार्दन चोरमले यांना दस्त नोंदणी करून दिला तिथंही पाण्याचा कायमचा प्रश्न मिटला त्या बोरवेलच पाणी कमी होत असतानाच सरपंच जनार्दन चोरमले यांनी दुरदूरष्टी ने विचार करत स्वतः थांबून पुन्हा गावातून पाईप लाईन जोडून उन्हाळ्याच्या आधीच जानेवारी मध्येच पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे.या पार्श्वभूमीवर सरपंच ग्रामस्थ यांचं एकच म्हणणे आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आम्ही त्यांचा कायम आदरच करणार परंतु जर पाण्याचा तसा काही प्रश्नांच नसताना आणि कोणतीही शहानिशा खातरजमा न करता आपण एकतर्फी बातमी का केली? याने गावाची प्रशासनाची,ग्रामपंचायतीची शिवाय आमच्या नेत्यांची सुद्धा बदनामी आहे. गावातील सार्वजनिक प्रश्नांकरीता गाव ग्रामस्थ युवक महिला एकजुटीने काम करत असतात याची अनेक उदाहरणे माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे आमच्या गावातील कोणत्याही वयक्तिक अथवा सार्वजनिक अडीअडचणी करीता आदरणीय राजेंद्र शेठ राजपुरे स्वतः त्याचे सहकारी तत्पर उपलब्धअसतात घर तिथं रस्ता आमदार फंडातून राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या अथक प्रयत्नातून सगळा कारभार गाव स्वच्छ सुंदर आहे जनार्दन चोरमले सरपंच झाल्यापासून स्वतः प्रत्येक ठिकाणी स्वतः लक्ष घालत लाईट ग्रामपंचायत हद्दीत येणारी सर्व कामे योजना मार्गी लावत आहेत.मग कोणीतरी छोट्याशा वैचारिक मतभेदासाठी काहीतरी खोडसाळ पणा करणार चुकीच्या पद्धतीने लक्ष केंद्रित करून घेणार अपुरी माहिती देणार आणि पत्रकार बंधू पूर्ण माहिती न घेता चुकीची बातमी करणार हे आम्हाला अपेक्षित नाही हे योग्य पण नाही सरपंच – ग्रामसेवक यांना स्वतःची चूक नसताना त्यांची चुकीची प्रतिमा निर्माण करून ती मलिन करण्याचा प्रयत्न होत असेल तर हे योग्य नाही आमची तीव्र नाराजी आहे.
उन्हाची तीव्रता भासत असल्याने सरपंच- ग्रामसेवक ग्रामपंचायत यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचे मार्च मध्येच योग्य नियोजन करण्यात आलेले आहे.प्रत्येक वाडीवस्तीला ऐका वेळी पाणी या महिन्यात सर्वांना सोडणं शक्य नसते कोणालाच अगदी महानगरपालिका सुद्धा नियोजन करतात करावंच लागत.यातून नाराज होऊन काहितरी कोणीतरी चुकीचे समज पसरवतात मात्र एखादया बातमी बद्दल अगोदर पूर्ण माहिती घेणे व दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया घेणे आवश्यक आहे इथून पुढे अशा गावाला हानिकारक बदनामीकारक अडचणी निर्माण करणाऱ्या पूर्ण माहिती न घेता चुकीच्या बातम्या कोणी केल्या तर कोणीही पत्रकार इलेक्ट्रॉनिक प्रिंट सोशल अथवा डिजिटल मीडिया असो तर त्यांच्यावर ग्रामपंचायत व ग्रामस्थ कासवंड यांच्यावतीने ठोस अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी सदर वेळी ग्रामपंचायत कासवंड चे सरपंच मा.श्री जनार्दन चोरमले. मा. उपसरपंच श्री रमेश बापू पवार. मा. ग्रामपंचायत सदस्य श्रीनिलेश गोळे. मा.श्री आनंदा पवार अध्यक्ष तंटामुक्त समिती श्री बापू पवार तंटामुक्त उपाध्यक्ष श्री श्रीरंग पावर अध्यक्ष भैरवनाथ ट्रस्ट. श्री शांताराम पवार. श्री धोंडिबा पवार. श्री विकास पावर श्री संदीप पवार श्री. शिवराम पवार श्री भरत पवार श्री बिपिन पवार श्री गणेश पवार श्री शरद पवार श्री संतोष पवार श्री पांडुरंग पवार शिपाई कासवंड ग्रामपंचायत जेष्ठ नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते….