पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला आदर्श वंत अधिकारी मिळाले कर्मचाऱ्यांसह पाचगणी करांकडून निखिल जाधव यांच्या कामाचे कौतुक
प्रतिनिधी
किरण अडसूळ
अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये असणाऱ्या पाचगणी नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी हे मद्यपान करणे छेडछाड करणे ठेकेदारांसोबत दारू पिणे व माजी नगरसेवकांसोबत कार्यालयाचे पडदे खिडक्या बंद करून बेकायदेशीर बांधकामांच्या माध्यमातून मिळणाऱ्या काळ्या मायेची सेटलमेंट करणे हे कारणामे माजी मुख्य अधिकाऱ्यांनी चालू ठेवत आपला आदर्श हा पाचगणी करांसमोर सातत्याने मांडत असल्याचे चित्र आम्हाला पाहायला मिळत होते परंतु नवनिर्वाचित मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे पाचगणी शहरांमध्ये आगमन होताच प्रचंड प्रमाणात आनंदी उत्साह हा कामगार वर्गामध्ये दिसून येत आहे इतकंच कायतर मुख्याधिकाऱ्यांनी आपल्यासमोरील लावलेल्या पडदा हा पूर्णपणे काढून टाकलेला आहे आणि इतक्या स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे, की त्या रस्त्यावरच्या सर्वसामान्य नागरिकांनी जरी माझ्या कार्यालयामध्ये पाय ठेवला तरी त्याला वाटलं पाहिजे माझ्या तक्रारींची निर्मूलन करण्याकरिता हा एक अधिकारी या खुर्ची वरती बसलेला आहे आणि हा माझ्या तक्रारींचे निर्मूलन करू शकतो त्यासाठीच शासन यंत्रणेने आम्हाला या ठिकाणी नेमलेल आहे माझ्या कार्यालयाचे दरवाजे नेहमी सर्वसामान्यांकरिता उघडे आहेत, याचाच शोध घेण्याकरिता आम्ही पाचगणी नगरपालिकेचे सफाई कामगार मुकादम राजेश लोहारा यांच्याशी संपर्क साधला असता मुख्य अधिकारी यांचे काम अतिशय चांगलं आहे त्यांच्या कामामुळे कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे, त्यांच्यामुळेच देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत न घडणारा इतिहास त्यांनी घडवलेला आहे, एका सफाई कामगाराच्या हातून ध्वजारोहण करून सफाई कामगाराचा सन्मान त्यांनी केलेला आहे, व नागरिकांशी संपर्क साधला असता महेंद्र सपकाळ म्हणाले नवनिर्वाचित मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे काम हे पाचगणी करांच्या हिताचं काम आहे त्यांच्यामुळे पाचगणी मध्ये बदल हा नक्की घडू शकतो असा विश्वास पाचगणी करांना आहे मुख्याधिकाऱ्यांनी चार्ज घेतल्यापासून पाचगणीच्या विकासाला चालना मिळालेली आहे, अधिकाराचा योग्य वापर पाचगणी शहरात होत आहे, पूर्वीचे मुख्याधिकारी हे केवळ एका विशिष्ट पक्षाचे मुख्य अधिकारी होते पाचगणीतील फुटकळ पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन व पैसे देऊन अनमोल कांबळे ने माजी मुख्याधिकारी यांचे तोंड काळे केले आहे असा खोटा आरोप करत अनमोल कांबळे वरती षडयंत्र करण्यात आलं व टेबल लॅंड येथील गोरगरीब अध्यक्षाला पावसाळी टेबल लॅंड बंद असते म्हणून घोड्याचे खाद्य देण्यात आले आणि अनमोल कांबळे विरुद्ध मोर्चा काढायला सांगितला आणी स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणाऱ्या शिवसेनेचा एका फोलकट असणाऱ्या माजी कार्यकर्त्यांने पाठबळ दिलं परंतु त्यांचा डाव फसला होता टार्गेट करून काम करणे आणि ठराविक माहिती अधिकार कार्यकर्त्यांना हाताशी धरून स्वतःची वावा करणे हा माजी मुख्य अधिकाऱ्यांचा फंडा होता परंतु आता नवनिर्वाचित मुख्याधिकार्यानी याल्लाचारीलाच लगाम घातल्यामुळे विरोधक स्वतः समोर येत नसून आपले हस्तक बाहेर काढायला लागले असल्याचे चित्र आम्हाला पाहायला मिळत आहे, मुख्याधिकारी भविष्यामध्ये या संपूर्ण गोष्टींना तोंड देत पाचगणी करांचा विकास हेच आपले ध्येय या गोष्टीवरती ठांब राहतील असा आमचा विश्वास आहे असे पाचगणी करांकडून मत व्यक्त होत आहे,

