हॉन्ड्री जोसेफ अनमोल कांबळे इम्रान क्षिरसागर व इतर सहकाऱ्यांनी निवेदन देताच मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्ये आश्वासन येत्या आठ दिवसात पाचगणी खड्डे मुक्त होईल,



हॉन्ड्री जोसेफ अनमोल कांबळे इम्रान क्षिरसागर व इतर सहकाऱ्यांनी निवेदन देताच मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्ये आश्वासन येत्या आठ दिवसात पाचगणी खड्डे मुक्त होईल,

पाचगणी प्रतिनिधी

माजी नगरसेवक हॉन्ड्री जोसेफ अनमोल कांबळे इम्रान क्षिरसागर अविश चव्हाण व इतर सहकाऱ्यांनी मिळून पाचगणी शहरामध्ये रोड वरती जागोजागी पडलेले खड्डे मृत्यूला हाक देत असल्याचे पाहायला मिळत होते त्याच अनुषंगाने आज दिनांक 23/2/2024 रोजी पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना पाचगणी शहरातील रहिवासी असलेले हे सर्व लोक भेटले आणि मुख्य अधिकाऱ्यांना पाचगणी शहराच्या समस्या व नागरिकांना होणारा त्रास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाचगणी तलाठी कार्यालय मज्जिद या ठिकाणी रोडला पडलेले खड्डे व इतर समस्या बाबत चर्चा केली असता निवेदन देणाऱ्यांना मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आश्वासन दिले की येत्या आठ दिवसात पाचगणी शहरातील सर्व खड्डे मुजवले जातील व नागरिकांना योग्य सोयी सुविधा पुरवल्या जातील असे आश्वासन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिल्यानंतर पाचगणी शहराचे माजी नगरसेवक हॅन्ड्री जोसेफ म्हणाले मुख्याधिकारी हे फार कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आम्ही त्यांना निवेदन देताच आमच्या तक्रारींचे निर्मूलन झालेले आहे आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेल आहे की येत्या आठ दिवसात पाचगणी शहर हे खड्डे मुक्त होईल त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो तर अनमोल कांबळे म्हणाले मुख्याधिकारी यांनी आईचा दर्जा या शहराला दिलेला आहे लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर या शहराला एका आधुनिक शक्तीने हेरले होते परंतु ती शक्ती या शहरातून तोंड काळे करून निघून गेली आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे या शहरांमध्ये आगमन झाले निखिल जाधव यांनी कारभार स्वीकारल्यापासून पोटच्या लेकरासारखी या शहरा वरती माया केलेली आहे नागरिकांना कुठलाही त्रास होईल असा आजपर्यंत कृत्य केलेले नाही उलट या शहराचा विकासच झालेला आहे आणि म्हणून निधी अपुरा असल्याने पाचगणी शहरात खड्ड्यांचा महापूर आला होता परंतु तोही आता दूर झालेला आहे मुख्याधिकारी यांनी आश्वासन दिलेल आहे की येत्या आठ दिवसांमध्ये खड्डे मुक्त पाचगणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचे अभिनंदन करतो तर इम्रान क्षिरसागर म्हणाले पाचगणी शहरात आठवडी बाजारा दिवशी जो टेबल लँड रोडला गाड्यांचा खच पाहायला मिळतो तो खच तिथे जमा न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन समोर पी प्लॉट या ठिकाणी जमा झाला पाहिजे यासाठी पी प्लॉट मध्ये उभ्या व बंद असलेल्या गाड्यांचा खच मोकळा करा आणि बुधवार दिवशी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या तिथे पार्क करा व रस्त्याला मोकळा श्वास घ्यायला मदत करा अशा मागण्याकरताच मुख्य अधिकाऱ्यांनी सर्व मागण्या मान्य करून येथे आठ दिवसात या सर्व मागण्यांचे निर्मूलन केले जाईल असे आश्वासन आज रोजी देण्यात आले.,