पाचगणी आयोजकांनी दोन वर्षा नंतर आयोजित केलेला पाचगणी फेस्टिवल चा पहिला दिवस उत्साहात साजरा,



प्रतिनिधी
अनमोल कांबळे

देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे व शैक्षणिक क्षेत्र म्हणून ओळख असणारे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे पाचगणी महाबळेश्वर मधील पाचगणी येथील पाचगणी फेस्टिवल हा आयोजकांनी कोरोना संकटानंतर दोन वर्षानंतर न धुमधडाक्यात उत्साहाने साजरा करण्याचे नियोजन केले असता फेस्टिवल चा पहिला दिवस हा उत्साहाने पार पडला असून दोन तीन चार तारखे पर्यंत वेग वेगळे फेस्टिवलच्या माध्यमातून आयोजकांनी कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे फेस्टिवल कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी साजरा होत असल्याने लोकांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण असल्याचे चित्र दिसून आले शाळेतील विद्यार्थ्यांचे डान्स असतील, मेजवानीचा तडका असेल, व खास करून बचत गटांन करिता बचत गटांना आपली छोटे उद्योग या फेस्टिवलच्या माध्यमातून लोकांसमोर प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याने महिलांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे उत्साहाचे वातावरण दिसून आले.