अखेर अनमोल कांबळे यांच्या तक्रारीला यश एनडीटीव्ही च्या बातमीची प्रशासनाकडून गंभीर दखल सुजित आंबेकर यांच्या वरती राज्यातून शुभेच्छांचा वर्षाव सुनिता झा सह संस्थाचालकांची तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासमोर शरणागती सातबार्या वरील नाव बदलण्याचे आदेश रात्री उशिरा तहसीलदारांकडून जारी.



प्रतिनिधी पांचगणी

अखेर अनमोल कांबळे यांच्या तक्रारीला यश एनडीटीव्ही च्या बातमीची प्रशासनाकडून गंभीर दखल सुजित आंबेकर यांच्या वरती राज्यातून शुभेच्छांचा वर्षाव सुनिता झा सह संस्थाचालकांची तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासमोर शरणागती सातबार्या वरील नाव बदलण्याचे आदेश रात्री उशिरा तहसीलदारांकडून जारी

देशभरात गाजत असणाऱ्या पाचगणी येथील पाकिस्तानच्या नावाने असणाऱ्या सर्वे नंबर 128/या जागेमध्ये न्यू एरा शाळा ही उभी केली गेली आहे, परंतु संस्थाचालकांची नावे संस्थाचालक हे या देशाचे आहेत की देशाच्या बाहेरचे आहेत हे अद्याप प्रशासनाकडून सांगण्यात आलेले नाही या संदर्भात तक्रार अर्ज सादर केल्यानंतर एनडीटीव्ही या वाहिनीने हे प्रकरण सातत्याने लावून धरले होते प्रशासनाच्या निदर्शनास वारंवार या संस्थेच्या आत दडलेल्या गुपित गोष्टींचे गबाळ बाहेर काढण्याचे काम सातारा जिल्ह्याचे एनडीटीव्ही चे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांच्या माध्यमातून सुरू होते परंतु अखेर सुजित आंबेकर यांच्या बातमी सह अनमोल कांबळे यांच्या तक्रारीला यश आले असून काल दिनांक २७/८/२०२४ रोजी रात्री उशिरा महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी मंडल अधिकारी पाचगणी यांना पत्र काढून सुनिता झा यांच्या नोटीसीला न जुमानता सातबार्या वरील पाकिस्तानी नाव हे रद्द करण्याचे पत्रकच काढले असून त्याची एक प्रत तक्रारदार यांना आज रोजी सुपूर्द केले आहे, ही बातमी वारागत पसरता जिल्हा सह महाराष्ट्रातून तक्रारदार अनमोल कांबळे व एनडीटीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी सुजित आंबेकर यांच्या वरती शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पाहायला मिळत आहे, या संदर्भात अनमोल कांबळे यांनी सांगितले की हे माझे यश नसून माझ्या सर्व सहकाऱ्यांचे यश आहे, व त्या संदर्भात आपण लवकरच बोलू परंतु खरे यश हे एनडीटीव्हीचे सातारा जिल्हा प्रतिनिधी सुजित आंबेकर यांचे आहे सातारा जिल्ह्यामध्ये इतरही माध्यमांचे प्रतिनिधी असतात परंतु मी स्वतः एबीपी माझा टीव्ही नाईन मराठी या चैनल चा मी खूप मोठा फॅन असून देश पातळीवरची बातमी या चॅनेलच्या प्रतिनिधींनी दाखवण्याचं काम केलेलं नाही ही फार मोठी माझ्या मनाला खंत पोचवणारी गोष्ट आहे, व या संदर्भात मी टीव्ही नाईन मराठी व एबीपी माझा यांच्या कार्यालयाला पत्र लिहून माझी खंत व्यक्त करणार आहे परंतु सुजित आंबेकर यांनी पत्रकारितेचा खरा धर्म पाळून जी माहिती माझ्याकडून उपलब्ध करून घेतली त्याच माहितीच्या आधारे इतरही माहिती गोळा करून व्यवस्थित रित्या या सर्व प्रकरणाच्या बातम्या केल्या त्या बातम्यांच्या माध्यमातूनच हा इतका मोठा पराक्रमाचा विजय हा आपण सर्वजण मिळवू शकलो नाही तर काही मुजरा वीर पत्रकारांनी माझ्याकडून माहिती उपलब्ध करून घेतली परंतु ती माहिती स्वतःच्या खर्चासाठी व स्वतःचे भांडवल तयार करण्यासाठी वापरली गेली ही माझ्या मनामध्ये फार मोठी खंत आहे., कधीतरी देशासाठी काम करा देश वाचवा तर संविधान वाचेल आणि संविधान वाचलं तर तुम्ही आम्ही वाचून नाहीतर स्वतःचे भांडवल तयार करण्याच्या नादात एक दिवस आपल्या माध्यमातून हा देश विकला जाईल ही जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये या शाळेविषयी आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून शाळेची एटीएस चौकशी असेल व इतरही चौकशी असतील या लवकरच करण्याकरिता आम्ही न्यायालयामध्ये अर्ज दाखल करणार आहोत असे अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे