सातारा प्रतिनिधी.
देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणी मध्ये एका शाळेचे संबंध थेट पाचगणी ते पाकिस्तान असे असल्याकारणाने व या संदर्भात अनमोल कांबळे आदित्य गायकवाड आशिष मोरे व इतर कार्यकर्त्यांनी मिळून मा.जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदनाद्वारे शाळेतील संस्था चालकांवरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून शाळा सरकार जमा करण्याची मागणी केली होती या संदर्भातल्या बातम्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर काल रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सातारा जिल्ह्याच्या दवऱ्या वरती असताना एनडीटीव्ही लोकवृत्त चे पत्रकार सुजित आंबेकर यांनी मा. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास पाचगणी ते पाकिस्तान ही बाब समोर आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट मा. जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना विचारले हे काय आहे असे म्हणताच क्षणी जितेंद्र दुडी यांनी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना सांगितले माझ्याकडे अनमोल कांबळे आदित्य गायकवाड यांची तक्रार दाखल झाली आहे व मी येत्या दोन दिवसात लवकरात लवकर या प्रकरणांमध्ये मोठी कारवाई करत आहे असे म्हणताच मुख्यमंत्री म्हणाले ही बाब अत्यंत गंभीर आहे मला तात्काळ कारवाई हवी आहे त्यानंतर साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी म्हणाले मी दोन दिवसाच्या आत कारवाई करतो असे म्हणता क्षणी तक्रारदार असणारे आदित्य गायकवाड अनमोल कांबळे यांच्या चेहऱ्यावरती हास्य व देशहितार्थ काम केल्याचे समाधान पाहायला मिळाले आहे आदित्य गायकवाड म्हणाले आमची मागणी ही आहे की शाळेच्या संस्था चालकांवरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून शाळा सरकार जमा करा, तात्काळ 7/12 बदला तर अनमोल कांबळे म्हणाले इतके वर्ष झाले ही संस्था धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर आहे की नाही? असा असणारा प्रश्न उभा राहिलेला आहे शिक्षणाधिकारी या संदर्भात आम्हाला माहिती देत नाहीत सातबाऱ्या वरती पाकिस्तान ब्रह्मदेश असा उल्लेख आहे मग हे संस्थाचालक पाकिस्तानचे हस्तक आहेत का? व जिल्हाधिकारी मंडल अधिकारी सांगतात की आम्ही येत्या दोन दिवसात पाकिस्तान नाव हटवून भारत इंडिया असे नाव लावणार आहोत तर इंडिया नाव कोणाच्या आदेशाने लावणार आहात याचे उत्तर आम्हाला जिल्हाधिकारी यांनी द्यावे आमची मागणी स्पष्टपणे आहे जोपर्यंत या सर्व प्रकरणाची चौकशी आंतरराष्ट्रीय दहशतवादी पथकाकडून होत नाही तोपर्यंत संस्था ही शिक्षण संस्था सरकारने चालवावी व सातबाऱ्या वरील पाकिस्तान नाव हटवून त्या ठिकाणी भारत सरकार असे नाव लावण्यात यावे ही असणारी मागणी आमची ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने राहील अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वाखाली देशभर राज्यव्यापी आंदोलन करू व संस्थाचालकांचा प्रशासनाचा निषेध करून असे आदित्य गायकवाड अमोल कांबळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे..,

