प्रतिनिधी
अनमोल कांबळे
मौजे भिलार नुकतेच पुस्तकाच्या गावामध्ये मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी नुकताच शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून आपल्या पदाचा आणि पैशाचा गैर वापराच्या माध्यमातून राजवाडा उभारत इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचा भंग करून शासकीय नोटिसांच्या चिंद्या करत शासकीय अधिकाऱ्यांच्या नियमांना आपल्या पायथ्याशी लाथाडून सर्वे नंबर 9 / मध्ये राजवाडा उभारत थेट शासनालाच आव्हान दिल आहे, व हे प्रकरण ताज असताच आता मे खडा तो सरकार से बडा हे म्हणत थेट उपविभागीय प्रांत अधिकारी वाई यांचा आपल्या डोक्यावरती हात आहे व यांच्याच मित्राचे काम मौजे भिलार सर्वे नंबर 33/33/ मध्ये चालू आहे असे सांगत अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची नियमानुसार शासकीय कारवाई या पाझर तलाव्याच्या शेजारी असणाऱ्या बांधकामावरती करायची नाही असे आवाहन करीत खंड्याने खेळ खंडोबा मांडलेला दिसून येत आहे, व दुर्दैवाची गोष्ट अशी की पाझर तलावाच्या पायथ्याशी आली शान हॉटेलच काम चालू असल्याने या हॉटेलकडे कुठलाही शासकीय अधिकारी उपविभागीय प्रांत अधिकारी वाई यांच्या आदेशामुळे फिरकत नसल्याचे स्पष्ट होत असल्याने या गोष्टीची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये चालू झालेली दिसून येत आहे शासकीय अधिकारीच असे करायला लागले तर कारवाया केवळ आणि केवळ गोरगरिबांवरच होणार की काय? असा असणारा प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झालेला दिसून येत आहे या संपूर्ण प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी स्वतः लक्ष घालून कारवाई करणार की पुन्हा एकदा खंडाचा खेळ खंडोबा चालू ठेवणार ? हे येत्या काही दिवसातच पाहायला मिळणार आहे,

