P W D पाचगणीतील शासकीय विश्राम ग्रह रेस्ट हाऊस बनत चालंय गोंजारी यांच्या आशीर्वादाने पर्यटकांचा छप्री पणाचा अड्डा



प्रतिनिधी*
*अनमोल कांबळे*

पाचगणी येथे असणारे शासकीय विश्राम ग्रह रेस्ट हाऊस हे शासकीय अधिकाऱ्यांन करिता व राजकीय लोकांकरिता आरामा करिता व बैठकांन  करीता आहे ‌परंतु पाचगणी येथे  शासकीय विश्राम ग्रहा मध्ये ‌भलताच व्यवसाय चालू असल्याचे निदर्शनास येत आहे
P‌ W‌ D खात्याचे महाबळेश्वर तालुक्याचे वरिष्ठ अधिकारी गोंजारी यांच्या आशीर्वादाने व त्यांचे सहकारी गवळी यांच्या सहकार्याने पाचगणी येथे रेस्ट हाऊस मध्ये हॉटेल व्यवसाय चालू केला आहे की काय? जनू  कळेनासे झाले आहे गोंजारी हे महाबळेश्वर बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी असताना सुद्धा त्यांच्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील खेड्यात पाड्यात जाणाऱ्या रस्त्यांची तर निष्काळजी दर्जाच्या कामामुळे दूर अवस्था ही झालीच आहे परंतु आता पाचगणी येथे शासकीय विश्रामगृहात देखील हॉटेल व्यवसाय चालू केला आहे की काय? असा असणारा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला दिसून येत आहे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार या दिवशी नियमानुसार दोन बुकिंग असल्यास त्या ठिकाणी 6/7 कुटुंब आश्रयाला येत असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि हेही समजते की हे लोक शासकीय अधिकारी नसतात, पण ? जर का हे लोक शासकीय अधिकारी आहेत तर मग? दारू सिगरेट अशा पार्ट्या करणे जोरजोरात आरडाओरडा करत असल्याने व रोड वरून येता-जाता लोकांना याचा त्रास होत असल्याने हे अधिकाऱ्यांन करिता  शासकीय विश्राम ग्रह आहे की छप्री पणाचा अड्डा बनला आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे परंतु  धक्कादायक गोष्ट म्हणजे दोन दिवस बुकिंग असतानासुद्धा आठवड्याचे आठ ही दिवस हे रेस्ट हाऊस फुल असतं म्हणून रात्री  11: नंतर गोंजारी यांच्या आशीर्वादाने चालणारे खेळ बंद होणार का?? असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला आहे,