आमच्या गावात भुरट्या दहशतीला थारा दिला जाणार नाही सरपंच जनार्दन चोरमले व सदस्य निलेश गोळे यांचा सज्जड इशारा…
November 3, 2022 | महाबळेश्वर
प्रतिनिधी पाचगणी…
महाबळेश्वर तालुक्यातील मौजे- कासवंड ता.-महाबळेश्वर येथील कासवंड गावातील सर्व्हे नंबर 22/1 मध्ये दोन व्यक्तीचा वयक्तिक स्वरूपाचा वाद आहे परंतु आज त्यांनी त्यांचा वाद हा कायदेशीर मिटवला पाहिजे मात्र आज सकाळी परस्पर दोन्ही मिळकत धारक यांनी बेकायदेशीर जमाव जमवत दिडशे- दोनशे बाहेरचे अनोळखी इसम गावात घेऊन येऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांनी विचारपूस केली असता अरेरावीची भाषा रात्री बेरात्री गोंधळ घालत आहेत सदरचा प्रकार निदर्शनास येताच पाचगणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व तणाव निवळला. ग्रामपंचायत कासवंड चे सरपंच श्री जनार्दन चोरमले सदस्य श्री निलेश गोळे ग्रामसेवक विजय राजपुरे. श्री आनंद पवार तंटामुक्ती अध्यक्ष. पांडुरंग पवार श्री संजय धामुनसे कांचन पवार श्री सुनील पवार श्रीआशिष पवार श्री दत्तात्रय पवार यांच्यासह सर्वांनी पाचगणी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन सदर प्रकार हा निंदनीय आहे आम्ही हे असले प्रकार गाव व ग्रामस्थ कधीही खपवून घेणार नाही गावाच्या सर्वांगिण विकासासाठी पुढे या उद्योग व्यवसाय वाढवा परंतु अशा दहशतीला गाव भीक घालणार नाही इथून पुढे अशा घटना घडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अशा मिळकतीचे ठराव घेऊन मिळकतीचे उतारे रद्द केले जातील ही नोंद घ्यावी असा सज्जड इशारा सरपंच श्री जनार्दन चोरमले व सदस्य निलेश गोळे यांनी दिला आहे….
Categories: महाबळेश्वर
Related Posts
शाईफेक प्रकरणी मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांचे राजकीय लोकप्रतिनिधी प्रमाणे वरिष्ठ व पाचगणी शहर परिसरातील नागरिकांना घेत समस्त पर्यायानचा आधार घेत दबावतंत्राचा वापर?…..
October 15, 2022
पाचगणी प्रतिनिधी….. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी नगरपरिषदेचे मुख्यधिकारी गिरीष दापकेकर यांच्यावर चार दिवसांपूर्वी पाठीमागून कोणीतरी शाइफेक केली.त्याचा निषेध नगरपरिषद संपूर्ण सातारा…
थापा पॉईंट सोडण्यासाठी माझ्यावर रिपब्लिकन पार्टी कडून पक्षाचं कार्ड वापरत दबाव व निवेदन देऊन गंभीर आरोप माझा हात पकडणाऱ्याचा मी हात तोडेन तक्रार नाही करणार आरोप करणाऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं मी भीक घालणार नाही दांडेघर ग्रामस्थांन वर खोट्या अट्रोसिटी ची मी साक्षीदार आहे … पूनम निलेश गोळे (कांबळे)
November 5, 2022
पाचगणी प्रतिनिधी..दिनांक 5 -11 – 2022 मौज – दांडेघर ता. महाबळेश्वर येथील सर्व्हे 10 थापा पॉईंट ही मिळकत श्री सुहास…
