कासवंड येथील युवा उद्योजक निलेश गोळे यांचा वाढदिवस महाबळेश्वर तालुक्याचे नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न..!



प्रतिनिधी पांचगणी

कासवंड येथील युवा उद्योजक निलेश गोळे यांचा वाढदिवस महाबळेश्वर तालुक्याचे नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न.

कासवंड येथील युवा उद्योजक व कासवंड ग्रामपंचायत सदस्य निलेश गोळे यांचा वाढदिवस महाबळेश्वर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहामध्ये वाढदिवस संपन्न झाला असल्याचे पाहायला मिळाले यावेळी निलेश गोळे यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल दापवडी येथे सकाळच्या सत्रा मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना व्याख्यान मार्गदर्शन व खाऊ वाटप करण्यात आला यावेळी आदिती वेलनेस संस्थेचे कोच किरण पवार दैनिक सकाळ वृत्तपत्राचे वार्ताहर रवी बेलोशे व खंडेराव साळुंखे नूतन शेलार स्नेहल कांबळे विशाल शेलार सुरेखा उंबळे कोमल गोळे निलोफर मलबारी योगेश जाधव अक्षय मोहिते विनीत मोरे न्यू इंग्लिश स्कूल संस्थेचे शिक्षक बुरूगले सर व संस्थेचे प्राचार्य यांच्यासह मान्यवरांनी‌ या कार्यक्रमाला उपस्थिती लावली असल्याचे पाहायला मिळाले कार्यक्रमावेळी मान्यवरांनी निलेश गोळे यांच्या समाजकार्या वरती मनोगत व्यक्त केले त्यानंतर सायंकाळच्या सत्रा मध्ये महाबळेश्वर तालुक्याचे नेते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून वाढदिवस संपन्न झाला असल्याचे पाहायला मिळाले यावेळी कार्यकर्त्यांसह मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करत निलेश गोळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असल्याचे पाहायला मिळाले.