पांचगणी येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा चषक वितरण सोहळा राजेंद्र शेठ राजपुरे निलेश गोळे शेखर कासुर्डे प्रकाश गोळे अंकुश आबा मालुसरे वसंतराव बिरामणे यांच्या सहप्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अखेर संपन्न…..!



प्रतिनिधी पांचगणी

पांचगणी येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा चषक वितरण सोहळा राजेंद्र शेठ राजपुरे निलेश गोळे शेखर कासुर्डे प्रकाश गोळे अंकुश आबा मालुसरे वसंतराव बिरामणे यांच्या सहप्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अखेर संपन्न…..!

पांचगणी येथील सालाबाद प्रमाणे पांचगणी व्यायाम मंडळ यांच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाते त्या अनुषंगाने आज स्पर्धेचा अखेर समारोप झाला असल्याचे पाहायला मिळाले गेल्या पाच दिवसांपासून पाचगणी शहरांमध्ये चालत असलेल्या या कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेऊन आपल्या खेळातील कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केला होता परंतु मानाचा तुरा अखेर विजेते संघांनी पटकवत आपल्या कौशल्याची बाजी मारत पहिल्या बक्षीसाचे मानकरी ठरवण्याचा मान विजेते संघाने पटकवून आपले कौशल्य प्रेरणादायी ठिकाणी फडकवल्याचे दिसून आले, त्या अनुषंगाने विजेते संघाला निलेश गोळे उद्योजक यांच्या वतीने मानाचे चषक व रोख रक्कम श्री राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या उपस्थितीमध्ये सुपूर्त करून आपल्या कैलासवासी आजोबांचे कार्य समाजासमोर जागृत ठेवण्याचे काम केले गेले त्यावेळी विजेते संघाला मानाचे चषक आणि रोख रक्कम बक्षीस स्वरूपात सुपूर्त करत असताना जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, निलेश गोळे, प्रवीण भिलारे शेखर कासुर्डे, प्रकाश गोळे, जगदीश गोळे, राकेश पांडे ( उद्योजक नवी मुंबई )अंकुश आबा मालुसरे (माजी सरपंच गोडवली ) वसंतराव बिरामणे, व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी विजेते खेळाडूंच्या चेहऱ्यावरती उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले व अखेर कार्यक्रमाचा समारोप उत्साह मध्ये पार पडला असल्याचे पाहायला मिळाले…