राजेंद्र शेठ राजपुरे च्या उपस्थितीमध्ये कासवंड ग्रामपंचायत सदस्य निलेश गोळेचां निर्धार गावचे 100% मतदान मकरंद आबा पाटलांनाच होणार……
प्रतिनिधी अनमोल कांबळे
महाबळेश्वर तालुक्यातील सर्वसमावेशक लोकमान्य नेतृत्व असणारे श्री राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान आमदार मकरंद आबा पाटील यांना कासवंड गावातून प्रचंड भरघोस मतदान देण्याचा निर्धार ग्रामपंचायत सदस्य निलेश गोकुळ गोळे यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे आमदार मकरंद आबा पाटील यांच्या साठी अहोरात्र झटणारे राजेंद्र शेठ राजपुरे हे महाबळेश्वर तालुक्यातील विकासाचे दूत आहेत व त्यांच्या माध्यमातून कासवंड गावातील अनेक विकासकामे आमदार फंडातून मार्गी लागली आहेत कासवंड गावात रस्ते, रस्ता रुंदीकरण, नूतन ग्रामपंचायत कार्यालय इमारत, बोरवेल, पाण्याची टाकी, सभागृह, स्वरक्षक भिंत, तरुणांच्या साठी जिमसाहित्य, राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या पुढाकाराने आमदार मकरंद आबा पाटील यांच्या फंडातून विकासाची अशी अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत व काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत त्याच प्रमाणे वारंवार शासनाच्या विविध योजना गावा सह तालुक्यात राबविण्यात आल्या आहेत लाडकी बहीण योजनेत एकही माता भगिनी वंचित राहू नये यासाठी राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी स्वतः पुढाकार घेत अनेकदा फोन करून सर्वांचे फ्रॉम भरून घेतले व आमदारांच्या माध्यमातून आम्हा सर्वांना राजेंद्र शेठ राजपुरे यांचे मार्गदर्शन असायचे की लाडकी बहीण योजनेसाठी गावातील गरजू महिलांचे फॉर्म भरून घ्या कोणीही लाभार्थी वंचित राहू नये वेळेचे बंधन न पाळता त्यांच्या वेळेनुसार फ्रॉम भरून घ्या असे कायम सुचविले आमदार मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून कासवंड गावातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार विविध माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे काम राजेंद्र शेठ राजपुरे यांनी केले आहे, मात्र याचा कुठेही आमदार अथवा स्वतः गाजावाजा करत नाहीत अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या माध्यमातून आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक पात्रतरुणांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून देण्यास सर्वतोपरी सहकार्य आवश्यक ती सर्व मदत गेली अनेक वर्ष करत आहेत म्हणूनच संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात राजेंद्र शेठ राजपुरे आखतील ते धोरण आणि बानतील ते तोरण असा निर्धार तालुक्यासोबतच कासवंड गावाने आम्ही सर्वांनी मिळून केला असून राजेंद्र शेठ राजुपरे यांच्या माध्यमातून भरघोस मतदान आमदार मकरंद पाटील यांना देणार असल्याचे कासवंड ग्रामपंचायत सदस्य श्री निलेश गोकुळ गोळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे..!

