पाचगणी प्रतिनिधी ….
महाबळेश्वर तालुक्यातील युवा नेते,महाबळेश्वर पंचायत समितीचे मा. सदस्य, सहकार रत्न पुरस्काराने सन्मानित सातारा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक मा. श्री राजेंद्र शेठ राजपुरे यांचा 1मे हा त्यांचा वाढदिवस हा विविध भरगच्च कार्यक्रमांनी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येत आहे महाबळेश्वर तालुक्यातील विविध गावांमध्ये रक्तदान शिबिर. मोफत आरोग्य तपासणी. सुरू असून त्यांच बरोबर वाढदिवसाचे औचित्य साधून शिवराज इंटरप्रायजेस व एस पि एन फिसिलिटी चे सर्वेसर्वा श्री निलेश गोकुळ गोळे ग्रामपंचायत सदस्य कासवंड हिरवेवाडी ता. महाबळेश्वर यांच्या वतीने हिलरेंज माध्यमिक हायस्कूल राजपुरी ता. महाबळेश्वर या हायस्कुल ला मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त पिण्याच्या पाण्याकरिता जल शुद्धीकरण यंत्र म्हणजेच वॉटर प्युरीफाइड भेट स्वरूपात देण्यात आली त्या क्षणी हायस्कूल चे सर्व शिक्षक उपस्थित होते ही भेट अत्यंत आवश्यक होती असे स्वतः शिक्षकांचेच मत आले.
मा.श्री राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक दर्जेदार विकासकामे व तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत वर्षभर त्यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम प्रशिक्षण शिबिरे सुरू असतात सध्या महाबळेश्वर तालुक्यात आपुलकीचे असे फार मोठे वलय त्यांनी स्वतः स्वकर्तुत्वाने निर्माण केलेले आहे
तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना ते आपले आधारस्तंभ वाटतात या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा असे मत श्री निलेश गोकुळ गोळे यांनी व्यक्त केले आहे….

