पाचगणीतील बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या एका माजी नगरसेवकाच्या पार्टीला नोटीस बजावल्याने मुख्याधिकारी निखिल जाधव ठरले राजकारणाचा बळी मुंबई से फोन आ जायेगा हमारा आदमी पोहच जायेगा म्हणल्याने नवीन मुख्याधिकाऱ्यांचे पाचगणी नगरपालिकेत इतिहासात पहिल्यांदाच फटाके वाजवत जोरदार स्वागत ती राजकीय शक्ती कोणाची.?



प्रतिनिधी अनमोल कांबळे

पाचगणीतील बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या एका माजी नगरसेवकाच्या पार्टीला नोटीस बजावल्याने मुख्याधिकारी निखिल जाधव ठरले राजकारणाचा बळी मुंबई से फोन आ जायेगा हमारा आदमी पोहच जायेगा म्हणल्याने नवीन मुख्याधिकाऱ्यांचे पाचगणी नगरपालिकेत इतिहासात पहिल्यांदाच फटाके वाजवत जोरदार स्वागत ती राजकीय शक्ती कोणाची ?

प्रशासकीय अधिकारी म्हणून पाचगणी नगरपालिका प्रशासनातील यंत्रणेवरती वचक असणाऱ्या व काही माजी नगरसेवकांसह पाचगणीतील बेकायदेशीर बांधकाम व्यवसाय करणाऱ्यांना व पाचगणी नगरपालिकेच्या कारभारामध्ये ढवळाढवळ करत असताना रोखणाऱ्या मुख्याधिकारी निखिल जाधव यांचा राजकीय बळी गेला का? अशी चर्चा मुख्याधिकारी निखिल जाधव यांची पाचगणी शहरातून बदली होताच सुरू झाली असल्याचे पाहायला मिळत आहे, मुख्याधिकारी निखिल जाधव हे आपल्या कर्तुत्वाशी प्रामाणिक असून त्यानी अनेक पाचगणी करांच्या हितार्थ निर्णय घेतले असल्याचे दिसून आले आहे पाचगणी करांच्या भविष्याचा विचार करतच मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून आपले प्रशासकीय अधिकार वापरून पाचगणीतील नगरपालिका मतदाराचा विचार करत त्याचा विकास केला तर दुसरीकडे मात्र तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी पाचगणी करांच्या मनाला घाव देत बिल्डर माफियाला मदत करत पर्यावरणाचा घात करण्यास मदत केली म्हणूनच तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना पाचगणी शहरातून तोंड काळे करून जावे लागले असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे, मुख्याधिकारी निखिल जाधव कर्तव्याशी प्रामाणिक असल्याने बेकायदेशीर बांधकाम उभारणार्या एका माजी नगरसेवक बांधकाम कॉन्ट्रॅक्टरच्या पार्टीला ब्ल्यू कंट्री हॉटेलच्या पाठीमागे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आपल्या कर्तृत्वाशी प्रामाणिक राहून अनाधिकृत बांधकाम उभारले म्हणून नोटीसीच्या माध्यमातून धक्का दिला असल्याचे पाहायला मिळत आहे, याचाच राग मनामध्ये धरत मुंबई से फोन आ जायेगा और हमारा आदमी पोहच जायेगा म्हणणाऱ्या व बेकायदेशीर बांधकाम उभारणार्या एका मुंबईतील व्यक्ती मुळेच मुख्याधिकारी निखिल जाधव यांची पाचगणी शहरातून तडकाफडकी बदली झाली का? असा असणारा प्रश्न उपस्थित झाला असून नवीन मुख्य अधिकाऱ्यांचे स्वागत मात्र पाचगणी शहरात बेकायदेशीर बांधकामांचे जाळे पसरवणाऱ्या‌ एका नगरसेवकाने व त्याच्या बगडबच्चनी जोरात केले असल्याचे पाहायला मिळाले असल्याचे दिसून आले आहे, नवीन मुख्याधिकारी यांची पाचगणी नगरपालिकेमध्ये एन्ट्री होताच फटाक्यांची आतिषबाजी करत पहिल्यांदाच स्वागत केल्याने नक्की पाचगणी नगर परिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी पंडित पाटील हे आले का? आणले ? असा असणारा प्रश्न पाचगणी करांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे.