प्रतिनिधी पांचगणी
पाचगणीतील डॉक्टर बिल्डर लॉबी जोमात नगरपालिका प्रशासन मात्र कोमात डॉक्टरांच्या मनमानी कारभाराला मुख्याधिकारी निखिल जाधव कधी आळा घालणार.?
पाचगणी नगरपालिका हद्दीतील फायनल प्लॉट नंबर १८७ व फायनल प्लॉट नंबर ४७९ मध्ये अनाधिकृत बांधकामांचा जणू बाजारच उभा राहिला असल्याचे चित्र पाचगणी नगरपालिका शेजारी पाहायला मिळत आहे, पाचगणी नगरपालिका शेजारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून शासन नियमावलीचा भंग करत कुठल्याही प्रकारची शासकीय प्रशासनाची परवानगी न घेता पाचगणीतील एका डॉक्टरसह एका बिल्डरने अनाधिकृत बांधकामे उभी करत असल्याचे धोरण आखले आहे मात्र यावरती कारवाई करण्याकरिता पाचगणी नगरपालिका अक्षरशहा दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे, मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पाचगणी नगर परिषदेचा पदभार स्वीकारल्यानंतर पाचगणी नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराला आता कुठेतरी आळा बसेल असे वाटत होते परंतु आळा न बसता रात्री अपरात्री संबंधित बिल्डर लॉबीने व एका डॉक्टरने नगरपालिका शेजारील अनाधिकृत बांधकामांचा बाजार सुरूच ठेवला असल्याने पाचगणी नगरपालिका प्रशासनाच्या कारवाई भूमिकेवरती आत्ता प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असल्याचे पाहायला मिळत आहे, तक्रारदारांनी नगर परिषदेमध्ये या अनाधिकृत बांधकामनाविरुद्ध तक्रारी दाखल केल्या असून देखील नगरपालिकेने कुठल्या प्रकारची कारवाई संबंधित बेकायदेशीर बांधकामांवरती केली नसल्याने आता मुख्याधिकारी निखिल जाधव हे नगरपालिका शेजारील फायनल प्लॉट नंबर १७८ व ४७९ मधील सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकामे रोखण्यात यशस्वी होणार का? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.

