प्रतिनिधी अनमोल कांबळे
पाचगणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाला आव्हान देत सिल्वर ओकच्या झाडांची कत्तल करत अनधिकृत बांधकाम मुख्य बाजारपेठेत उभारणाऱ्या डॉक्टर वरती मुख्याधिकारी निखिल जाधव कारवाई कधी करणार.
पाचगणी नगरपालिका हद्दीमध्ये फायनल प्लॉट नंबर १८७/ मध्ये एका दंतवैद्य डॉक्टर ने पूर्वी याच फायनल प्लॉट नंबर मध्ये अनाधिकृत बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पाचगणी नगरपालिकेने त्याचा प्रयत्न हा हाणून पाडला होता त्यानंतर पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांची पदोनियुक्ती झाली आणि त्या जागे वरती अतिरिक्त चार्ज घेत मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी पाचगणी नगर परिषदेचा कारभार पाहण्यास सुरुवात केली त्यानंतर अचानक रित्या दंत वैद्य डॉक्टर ने आपली जादूची छडी वापरून रातोरात सिल्वर ओक झाडांची कत्तल करत अनाधिकृत बांधकामाची बी फायनल प्लॉट नंबर /१८७ / मध्ये रवली असल्याचे दिसून आले आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात जुन्या पाचगणी पोलीस स्टेशन समोरील जागेमध्ये अनाधिकृत बांधकाम सुरू असून पाचगणी नगर परिषदेतील बांधकाम विभागातील अधिकारी हे कुणाच्या आशीर्वादाने गप्प आहेत? असा असणारा प्रश्न पाचगणी करांना पडला आहे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये करोडो रुपयाची इमारत उभी होत असताना या इमारतीच्या काळ्या मायेचे भागीदार पाचगणी नगरपालिकेतील ते अधिकारी कोण याची चौकशी पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव करणार का? पाचगणी नगरपालिके मार्फत फायनल प्लॉट नंबर 187/ मध्ये सुरू असणाऱ्या अनाधिकृत बांधकामावरती मुख्याधिकारी निखिल जाधव कारवाई करणार का? सदर बांधकामाचा पंचनामा होणार का ? व दंतवैद्य डॉक्टरला इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये एफएसआय कमी असताना पाचगणी नगरपालिकेच्या नियमावलीचा भंग करून अनधिकृत बांधकामांचे काम पूर्ण करायला सांगणारा व डॉक्टरला पाठिंबा देणारा तो डॉक्टरचा आधारस्तंभ कोण? याचा शोध मुख्याधिकारी निखिल जाधव घेणार का? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे, पुढील बातमी भाग दोन मध्ये

