मुख्याधिकारी निखिल जाधव यांची बदली होताच पाचगणी नगरपालिका हद्दीमध्ये सर्व धर्मीय शाळेसाठी आरक्षित असणाऱ्या फायनल प्लॉट नंबर 3/5/ मध्ये एका विशिष्ट समाजासाठी मदरशा शाळा उभारण्याचे काम सुरू प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड उत्खनन प्रशासनाची मात्र हाताची घडी आणि तोंडावरती बोट..‌?



मुख्याधिकारी निखिल जाधव यांची बदली होताच पाचगणी नगरपालिका हद्दीमध्ये सर्व धर्मीय शाळेसाठी आरक्षित असणाऱ्या फायनल प्लॉट नंबर 3/5/ मध्ये एका विशिष्ट समाजासाठी मदरशा शाळा उभारण्याचे काम सुरू प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड उत्खनन प्रशासनाची मात्र हाताची घडी आणि तोंडावरती बोट

प्रतिनिधी अनमोल कांबळे

इतर दिवशी सर्वसामान्यांवरती कारवाईचा बडगा उभारणारे महसूल प्रशासन पाचगणी नगरपालिका हद्दीमध्ये फायनल प्लॉट नंबर 3/5/ मध्ये सर्वधर्मीय शाळेच्या आरक्षित जागेवरती एका विशिष्ट समाजाचे मदरशा शाळा उभारण्याचे काम सुरू असताना हाताची घडी व तोंडावरती बोट घेऊन गप्प बसल्याची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे, पाचगणी नगरपालिका हद्दीमध्ये फायनल प्लॉट नंबर 3/5/ ही जागा सर्व धर्मीय विद्यार्थ्यांच्या शाळेकरीता आरक्षित जागा असून एका विशिष्ट समाजाने पहिले या जागेच्या शेजारी ऐश्वर्या हॉटेलच्या खालच्या बाजूला दोन बंगले भाड्यावरती घेऊन आपल्या समाजाची शाळा ही तीन वर्षांपासून सुरू केली आहे असे समजते शाळेमध्ये इतर कुठल्याही समाजाची मुले नसून एका विशिष्ट समाजाची मुलं शिक्षण घेत असतात व या वरती कुठलीही प्रकारची प्रशासनामार्फत शिक्षक अधिकाऱ्यांमार्फत विभागामार्फत कारवाई होत नसल्याने आता मात्र पाचगणी नगरपालिका हद्दीमध्ये शाळेकरीता आरक्षित असणाऱ्या फायनल प्लॉट नंबर 3/5/ मध्ये एका विशिष्ट समाजाचे मदरशा उभारून शाळा सुरू करण्याचे काम एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी सुरू केले असल्याचे नगरपालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, ज्या जागेवरती सध्या स्थितीमध्ये वृक्षतोड उत्खनन करून ही भली मोठी इमारत उभारण्याचे काम सुरू आहे ती जागा पाचगणी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असून त्या जागेच्या वरच्या बाजूला एका विशिष्ट समाजाची हेरिटेज वास्तू आहे, हेरिटेज वास्तु असताना खालच्या बाजूला मात्र नगरपालिका सर्वधर्मीय मुलांकरिता आरक्षित असणाऱ्या शाळेच्या जागे करिता पाचगणी नगरपालिकेचा प्लॉट असताना या जागेवरती एका विशिष्ट समाजाकरिता मदरशा व शाळा बांधण्याची परवानगी कुठल्या अधिकाऱ्यांनी दिली? व तशी दिली नसल्यास राजरोसपणे दिवसाढवळ्या वृक्षतोड करत झाडांचा चारी बाजूने दगडी बांधकाम करत झाडांचा गळा वळणे व रात्रीच्या अंधारामध्ये झाडे तोडणे व दिवसा ढवळ्या उत्खनन करणे ही परवानगी या धनदांडग्या वृत्तीला कुठल्या अधिकाऱ्यानी दिली? असा असणारा प्रश्न पाचगणी शहरातील नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित झाला असून यासंदर्भात प्रशासन काय भूमिका घेणार याकडे पाचगणी करांचे लक्ष लागले आहे,