प्रतिनिधी अनमोल कांबळे
पाचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कामाची शासनाकडून दखल पद नियुक्ती मिळाली.
पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी असणाऱ्या निखिल जाधव यांच्या कामाची शासनाकडून कौतुकास्पद दखल घेत मुख्याधिकारी निखिल जाधव यांना आयुक्त पदी नियुक्ती मिळाली असल्याने पाचगणी शहरांमध्ये सर्वत्र आनंदी वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, शांत संयमी मितभाषी मुख्याधिकारी यांनी आपल्या बुद्धी चातुरियाच्या जोरावरती पाचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पाचगणी शहरांमध्ये अनेक विकास कामे त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती त्यामध्ये निखिल जाधव यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे सिडनी पॉइंट येथे पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता ऍक्टिव्हिटीज लावणे रस्ता रुंदीकरण करणे टेबल लँड वरती ब्लॉकेज बसवणे स्थानिकांना रोजगारा करिता गाळे उपलब्ध करून देणे यासह वाड्या वस्त्यांमध्ये विविध प्रकारचा विकास मुख्याधिकारी यांच्या कार्यक्षमतेमध्ये झाला असल्याचे पाहायला मिळाले याच विकास कामाची दखल घेत शासनाने आता मुख्याधिकारी निखिल जाधव यांना पदोन्नती देऊन त्यांचा सन्मान केला असल्याची ही दिसून आले असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण असून मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे.

