रंजन कांबळे जॉन जोसेफ दिलीप सपकाळ यांच्या निवेदनानंतर मुख्याधिकारी निखिल जाधव ॲक्शन मोडमध्ये सिद्धार्थ नगर मधील सर्व रखडलेली विकास कामे मार्गे लावणार..!



प्रतिनिधी अनमोल कांबळे

रंजन कांबळे जॉन जोसेफ दिलीप सपकाळ यांच्या निवेदनानंतर मुख्याधिकारी निखिल जाधव ॲक्शन मोडमध्ये सिद्धार्थ नगर मधील सर्व रखडलेली विकास कामे मार्गे लावणार..!

पाचगणी येथील सिद्धार्थ नगर मधील विविध रखडलेल्या विकास कामांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने सिद्धार्थ सेवा संघाच्या वतीने रंजन कांबळे जॉन जोसेफ व इतर कार्यकर्त्यांनी पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना विकास कामासंदर्भात निवेदन दिल्यानंतर पाचगणी नगर परिषदेचे मुख्यअधिकारी निखिल जाधव हे ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले निवेदनात म्हटले आहे की सिद्धार्थ नगर हे गावठाण म्हणून घोषित करा सिद्धार्थ नगर मधील गट्रे ही उध्वस्त झाली आहेत ती सुरळीत व चांगल्या दर्जाची करा सिद्धार्थ नगरचा हा अखंड सातबारा भूमी अभिलेख विभागामार्फत वेगळा करा या व अशा अनेक प्रश्नां करिता दिनांक 30/1/2025 रोजी सिद्धार्थ नगर च्या वतीने मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन देण्यात आले यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर सिद्धार्थ नगर मधील लोकांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले यावेळी सिद्धार्थ सेवा संघाचे अध्यक्ष रंजन कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष जॉन जोसेफ दिलीप सपकाळ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.