पाचगणी नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी निखिल जाधव है सफाई ठेकेदार असणाऱ्या रुपेश चव्हाण व पार्किंगच्या नावाखाली शासनाच्या डुबलीकेट पावत्या छापणाऱ्या शिराज नावाच्या ठेकेदारावरती कारवाई कधी करणार,? याकडे पाचगणी करांचे लक्ष.,



पाचगणी नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी निखिल जाधव है सफाई ठेकेदार असणाऱ्या रुपेश चव्हाण व पार्किंगच्या नावाखाली शासनाच्या डुबलीकेट पावत्या छापणाऱ्या शिराज नावाच्या ठेकेदारावरती कारवाई कधी करणार,? याकडे पाचगणी करांचे लक्ष.,

प्रतिनिधी
अनमोल कांबळे

पाचगणी नगरीचा पदभार स्वीकारल्यापासून भल्याभल्यांना आपल्या कर्तुत्वाने घाम फोडणाऱ्या व सुशिक्षित पणाचा बुरखा अंगावरती घेऊन सामाजिक पणाचे ढोंग मांडलेल्या धनदांडग्यांच्या कार्यक्रमांच्या बाजारात न दिसणाऱ्या, पाचगणी नगरीचे मुख्याधिकारी निखिल जाधव हे आता रुपेश चव्हाण या पाचगणी नगरपालिकेच्या ठेकेदारा वरती कारवाई कधी करणार? याकडे पाचगणी करांचे लक्ष लागून राहिले आहे काही दिवसांपूर्वीच कामगारांच्या टाळूवरचे लोणी खाल्ल्या प्रकरणी रुपेश चव्हाण यांच्यावरती कामगार आयुक्तांन मार्फत गुन्हा दाखल करण्यात आला होता., त्यानंतर अपेक्षा होती की इथून पुढे रुपेश चव्हाण या ठेकेदाराला पाचगणी नगरपालिका ब्लॅक लिस्टमध्ये टाकेल परंतु संबंधित ठेकेदार हा तत्कालीन नगराध्यक्षांचा अत्यंत जवळचा मानला जाणारा हस्तक असल्याने संबंधित ठेकेदारावरती पाचगणी नगरपालिका कारवाई करत नसल्याचे चित्र सध्याला पाहायला मिळत आहे., त्याच प्रकारे पाचगणी नगरपालिकेमध्ये पार्किंगच्या नावाखाली बोगस पावत्या छापून शासनाला लुटणारा पाचगणी शहरातील शिराज नावाचा ठेकेदार देखील अशाच प्रकारे मागील काही दिवसांमध्ये चर्चेला आला होता परंतु अचानक पणे त्यालाही ब्लॅकलिस्टमध्ये ढकलण्याऐवजी पाचगणी नगरपालिका त्याच्यावरती मेहरबान होऊन स्वच्छ सर्वेक्षण च्या नावाखाली संबंधित ठेकेदाराला आणखी एक ठेका देत त्याचा सन्मान करण्याचे काम पाचगणी नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराने केले असल्याचे चित्र पाहायला मिळत होते त्याच प्रकारे त्याने देखील कामगारांच्या हितार्थ कुठलाही कामगारांचा विमा न उतरवता रजिस्टरला वेगळे कामगार व परिस्थिती ही वेगळीच असे चित्र रंगवत शासनाला लुटण्याचे काम केले असल्याचे दिसत असून शहरांमध्ये या शिराज नावाच्या ठेकेदारावरती कारवाई हे कामगार आयुक्त कधी करणार अशी विचारपूस कामगार आयुक्त यांच्याशी केले असता या ठेकेदाराबाबत आपल्याकडे अध्याप तक्रार उपलब्ध झाली नसल्याने तक्रार उपलब्ध होताच त्याच्यावरती देखील चौकशी करून योग्य ती उचित कारवाई केली जाईल असे कामगार आयुक्त सातारा यांनी सांगितले आहे, व अशी परिस्थिती असताना आता शिराज नावाच्या ठेकेदाराला आणखी एक पाचगणी नगरपालिकेने सेक्युरिटी चा ठेका दिला असल्याचे समजत असल्याने पाचगणी शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचे मत असल्याचे दिसून येत आहे, आता पाचगणी नगरपालिकेच्या भिंती सुरक्षित राहणार का? असा देखील प्रश्न उपस्थित झाला असल्याने या दोन्हीही ठेकेदारांवरती पाचगणी नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कारवाई कधी करणार की पुन्हा एकदा आणखी नवीन ठेके देऊन यांचा सन्मान करणार हे बघणं गांभीर्याचे ठरणार आहे..,