तीन अपत्य असल्याची माहिती शासनापासून लपूऊन गरजूंना आपल्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या शिक्षकाला लवकरच बेनकाब करणार, अनमोल कांबळे.



2005 नंतर तीन अपत्य असल्यास शासकीय सेवेत रुजू करता येत नाही असा केंद्र व राज्य शासनाचा जीआर असताना. 2005 पूर्वी दोन अपत्य व पाच नंतर एक अपत्य असे असताना देखील शासनापासून आपली खरी माहिती लपवून ठेवून शासकीय योजनांचा लाभ घेत महाबळेश्वर तालुक्यातील एका शिक्षकाने शासनाची दिशाभूल करून शासनाचा अनेक वर्षांपासून पगार लुटण्याच काम केलेलं आहे, व हा शिक्षक बडतर्फ झाल्यास याच्या जागेवरती एखादा गरजू गरीब होतकरू युवकाला संधी मिळू शकते. परंतु मी आणि माझ्या नंतर माझा मुलगा हे धोरण बाळगणाऱ्या या शिक्षकाने संपूर्ण यंत्रणा दलालांच्या माध्यमातून मॅनेज करण्याचे काम केलेल आहे, आणि याच्याच निषेधार्थ मी आवाज उठवलेला आहे मला महाबळेश्वर तालुका शिक्षणाधिकारी यांनी आश्वासन दिलेल आहे, की लवकरच या शिक्षकावरती बडतर्फीची कारवाई करून‌. याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात आम्ही पाठवू परंतु असे न झाल्यास, आंदोलनाच्या माध्यमातून या शासनाला प्रशासनाला आणि या झोपलेल्या यंत्रणेला जागा करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मात्र हा शिक्षक दूध पाजायण्या ऐवजी स्वतःच पीत आहे कि काय, असा असणारा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झालेला आहे. असे अनमोल कांबळे यांनी सांगितले,.