पाचगणी प्रतिनिधी*
*अनमोल कांबळे*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष व लोकप्रतिनिधी निवडीची घोषणा करताच काही महिन्यानंतर येऊन ठेपलेल्या निवडणुकीमध्ये पाचगणी शहरांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे अनेक वर्षांपासून पाचगणी नगरपालिकेमध्ये साम दाम दंड भेद वापरून आपली सत्ता कायम राखण्यात कराडकर यांना यश आले होते. परंतु काही काळानंतर त्यांच्या याच यशाला प्रत्युत्तर देत त्यांच्यासोबत असणाऱ्यांनीच त्यांच्याच विरुद्ध बंड पुकारला होता. प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचाराचा आरोप करत सत्तेमध्ये असणारे नगरसेवक हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व पाचगणीचे माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आपला विरोध प्रखरपणे मांडत होते परंतु आता पुन्हा एकदा जनतेतून नगराध्यक्ष निवडीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करताच पाचगणी शहरातील नागरिकांकडून पाचगणीचे माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांनीच या निवडणुकीला सामोरे जाऊन पाचगणी शहरातील लोकांना त्यांच्या उज्वल भविष्याकरिता निवडणुकीला सामोरे जाऊन लोकांना योग्य दिशा दाखवण्याचे काम करावे असा पाचगणीतील सामान्य नागरिकांकडून जोर वाढू लागलेला दिसून येत आहे तर दुसरीकडे कराडकर समर्थकांमध्ये आता परिवर्तन नाही तर आता पुन्हा एकदा विकासाची लाट येईल अशी शक्यता उद्भवली जात आहे एकीकडे सर्वसामान्य तर एकीकडे समर्थक अशी येणाऱ्या निवडणुकीत रंगत पहायला मिळणार आहे. मागील पंचवार्षिक मध्ये नगरपालिकेची असणारी मिळकत ही ज्या प्रकारे हॉटेल नमस्ते पुरोहित यांनी हडपली,. आणि हडपल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी या विषयी आवाज न उठवता सर्वसामान्य मतदाराला व्यवसायापासून वंचित ठेवलं, धनदांडग्यांना एक न्याय आणि गरिब मतदाराला एक न्याय. देणाऱ्या सत्ताधारी कराडकर यांना या निवडणुकीमध्ये फटका बसणार का ?? आणि कासुर्डे यांचा विजय होणार का?? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे व येणार्या निवडणूकी मध्ये ही रंगत पाहायला मिळणार आहे.

