हॉन्ड्री जोसेफ अनमोल कांबळे इम्रान शिरसागर यांच्या निवेदनाला यश पाचगणी नगरपालिकेमध्ये निधी उपलब्ध होताच मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शब्द पाळला पाचगणी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरवात



हॉन्ड्री जोसेफ अनमोल कांबळे इम्रान शिरसागर यांच्या निवेदनाला यश पाचगणी नगरपालिकेमध्ये निधी उपलब्ध होताच मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शब्द पाळला पाचगणी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरवात

पाचगणी प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून पाचगणी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रोडला पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटकांन सह नागरिकांची मोठी हेळसांड होत असल्याचे चित्र दिसून येत होते व नागरिक ही या गोष्टीला प्रचंड प्रमाणात त्रासलेले होते परंतु या विषयावरती कुठलाही राजकीय पक्ष आवाज उठवत नसल्याचे चित्र पाहायला मिळत होते परंतु या विषयावरती पाचगणी नगरपालिकेचे माजी नगरसेवक हॅन्ड्री जोसेफ अनमोल कांबळे इम्रान शिरसागर व इतर सहकाऱ्यांनी आवाज उठवताच मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शब्द दिला की सध्या नगरपालिकेमध्ये निधी उपलब्ध नाही तुमच्या मागण्या या रास्त आहेत परंतु पाचगणी नगरपालिकेमध्ये निधी उपलब्ध होताच पाचगणी नगरपालिका हद्दीमधील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे सुशोभीकरण करू अशी ग्वाही दिल्यानंतर मुख्याधिकारी सुशोभीकरण कधी करणार ? असा देखील प्रश्न उपस्थित होता परंतु आता निधी उपलब्ध झाला असल्याने मुख्याधिकारी यांनी आपल्याला सांगितले आहे असे पाचगणी नगरपालिकेचे माजी नगरसेवक हॅन्ड्री जोसेफ अनमोल कांबळे इम्रान शिरसागर यांनी सांगितले हॅन्ड्री जोसेफ म्हणाले मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे काम हे योग्य दर्जाचे आहे सध्या त्यांच्याविषयी पाचगणी शहरातून नागरिकांच्या कुठल्याही प्रकारच्या तक्रारी नाहीत व मुख्याधिकारी यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळलेला आहे पाचगणी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या सुशोभीकरणाला त्यांनी आज रोजी सुरुवात केलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो तर अनमोल कांबळे म्हणाले मुख्याधिकाऱ्यांना आम्ही भेटलो त्यांना आम्ही निवेदन दिलं मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळलेला आहे आज पाचगणीतील प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालेल आहे त्याबद्दल आम्ही मुख्याधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि मुख्य अधिकाऱ्यांना एकच सांगतो की त्यांनी स्थानिकांना सहकार्य करावे निखिल जाधव यांचा आतापर्यंतचा कारभार हा योग्य दिशेने चालू असल्याचे सध्याला तरी दिसत आहे, कारण मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी चार्ज हातामध्ये घेतल्यापासून माजी नगरसेवक एजंट आता पाचगणी नगरपालिकेमध्ये कमी फिरकत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे आम्ही आशा बाळगतो अशाच प्रकारे कारभार इथून पुढे देखील चालू राहील तर इम्रान शिरसागर म्हणाले आम्हाला मुख्य अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही फक्त त्यांनी लोकांना सोयी सुविधा या योग्य दर्जाच्या द्याव्यात जे ठेकेदार ब्लॅक लिस्टमध्ये आहेत ते दुसऱ्याच्या नावावरती तर ठेका घेऊन चालवत नाहीत ना याची देखील चौकशी मुख्य अधिकाऱ्यांनी करावी व ते नागरिकांना योग्य सुविधा पुरवतात का याचा देखील अहवाल मुख्य अधिकाऱ्यांनी घ्यावा आज मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळलेला असल्याने केवळ आम्हीच आनंदी नसून पाचगणी शहरातील प्रत्येक नागरिक हा आनंदी झालेला आहे, कारण आमचा विकास करण्याकरिता ज्या आमदारांना आम्ही निवडून दिले त्यांना मात्र आमच्यासाठी आता वेळ नाही परंतु तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करतो असे इम्रान शिरसागर यांनी सांगितले.,