सुधारीक पणाचे धोंड बंद करून वस्तुस्थितीची निर्मिती करणे फार गरजेची आहे



महाबळेश्वर तालुका अप्रतिष्ठेच ढोंग बाळगणारा तालुका या तालुक्यांमध्ये अनेक संघटना एका रात्रीत जन्मला आल्या अनेक संघटना एका रात्रीतच हो त्याच्या नाहीत्या झाल्या हे मी पाहिल आहे,….

आज बोलण्याचा विषय उद्भवलेला आहे तो म्हणजे महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयातील टक्केवारीच्या ? आकडेवारी मुळे?

उपविभागीय प्रांत अधिकारी वाई यांची बदली झाली आणि बदलीच्या मागचं कारण हे गुलदस्तात असतानाच अचानक खबर आली की प्रांतांनी आपल्या बदलीवरती स्टे घेतला आहे? हे ऐकायला बरं वाटलं आता या तालुक्यांमध्ये एका नवीन प्रवाहाची सुरुवात होती की काय ? असं वाटलं होतं परंतु प्रवाहाची सुरुवात न होता त्याच वस्तुस्थितीला खतपाणी घालून त्या पुनरावृत्तीची सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळालं महाबळेश्वर तहसीलदारांचा कारभार स्वच्छ की अस्वच्छ ? हा प्रश्ना आर्थिक चिन्ह आजही तालुक्यातील हुशार आणि तज्ञांच्या नजरेसमोर आहे….?
कारण पर्यावरण वाचलं तर वनप्राणी वाचणार आहेत आणि वनप्राणी त्यांच्या घरामध्ये सुरक्षित राहिला तर शेतकरी त्याची शेती आणि शेतकऱ्याचे कुटुंब सुरक्षित राहणार आहे त्याचं कारण त्या शेतकऱ्याचं कुटुंब उध्वस्त होईल असं कृत्य वन प्राणी त्यांचं घर म्हणजेच जंगल उध्वस्त झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सिमेंटची डोंगरे उभी राहिल्यानंतर तो शेतकऱ्याच्या घराकडे त्याच्या पोटाचा आधार असणार्या शेतीकडे ओळतो आणि त्याने कष्ट करून उभारलेली शेती सध्याला तालुक्यामध्ये उध्वस्त होत असल्याचे चित्र आम्हाला दिसत आहे कुटुंब उध्वस्त होताना दिसत आहे आणि हे जर का थांबवायचं असेल त्याला त्याचे शेतातून आठ दहा पोती गहू भेटून द्यायचे असतील तर वनप्राणी गव्यांच्या जंगलाचे रक्षण करणे हे आपलं प्रथंम काम आहे परंतु सध्या तालुक्यातील नवीन प्रवाहाची सुरुवात झालेली आहे अधिकाऱ्यांनी हाताखालचे तलाठी च स्वतःचे एजंट म्हणून नेमलेले आहेत की काय? असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला आहे एकीकडे गीते तलाठ्यांसारखे ज्यांच्या हवाली चार गावे करून वरिष्ठ अधिकारी हे टक्केवारीतील आकडेवारी मोजत असतात तर दुसरीकडे कागदावरती ओढलेल्या आडव्या रेषांच्या भाषा या तक्रारदाराला देऊन दिशाभूल करण्याचे काम करत असतात, तर दुसरीकडे छोट्या-मोठ्या संघटनांच्या चिंपाट पदाधिकाऱ्यांना तलाठी हजार पाचशे पाच हजार देऊन त्यांच्या किरकोळ पक्ष निधीच्या जाहिरातींच्या नावाखाली पावत्यांचा पाऊस पाडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ते थांबले गेले पाहिजे, याचा विचित्र प्रकार एक होतो पर्यावरण आमचं वाचत नाही परंतु फाटक्या कार्यकर्त्यांच्या रोजच्या पक्षांच्या कार्यक्रमांच्या नावाखाली हीत असणारा प्रस्थापित पर्यावरण व भूमिपुत्र शेतकरी उध्वस्त होत चाललेला आहे, ही तालुक्यातील वस्तुस्थिती उपविभागीय प्रांताधिकारी वाई यांनी स्वतः लक्षात घेवून ते स्टे घेऊन थांबले असले तर ? त्यानी थांबवली गेली पाहिजे,‌‌……

कारण महाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदारांवरती आत्ता हित असणाऱ्या प्रस्थापित भूमिपुत्राचा विश्वास राहिलेला नाही त्यांचे कारण त्यांचे धोरण हे विचित्र दिशेने जाताना आम्हाला पाहायला मिळत आहे हित असणार्या प्रस्थापित भूमिपुत्राला न्याय देत असताना तहसीलदार कमी पडल्याचे चित्र सध्याला तरी पाहायला मिळत आहे,…..

अनमोल कांबळे

के दरिया अब तेरी खैर नही बुंदो ने बगावत करली है नादान मत समज बुजदील ईनको लेहरोने बगावत कर ली है हम परवाने है मौत समा मरने का किसको ख्वाब यहा रे तलवार तुझे झुक ना होगा गर्दन ने बगावत कर ली है…….