पाचगणी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद पाचगणी शहरासह परिसरात दुकाने कडकडीत बंद,
पाचगणी प्रतिनिधी
पाचगणी सकल मराठा समाजाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी पूकारलेल्या बेमुदत उपोषणाला पाचगणी येथील मराठा समाजाने पाठिंबा देत शहरा सह परिसरामध्ये दुकाने व्यापार व्यवसाय कडकडीत बंद ठेवत उपोषणाला आपला पाठिंबा जाहीर केला परंतु या बंदला शहरासह परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पाचगणी परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवत शहरातील दुकाने कडकडीत बंद राहिली मोर्चा वेळी मान्यवरांची भाषणे झाली व यशस्वीरित्या एक दिवशीय बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळत बंद शांततेत पार पडल्याचे दिसून आले,

