मालाज फुड प्रॉडक्टस प्रा.लि.तर्फ श्री श्रीपाद वामन सहस्त्रबुद्धे यांच्याकडून उपविभागीय प्रांत अधिकारी वाई यांच्या दोन वर्षांपूर्वीचे पत्र दाखवत 15 झाडांची हत्या तलाठी सर्कल तहसीलदार यांची मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट मालाज फॅक्टरीचा ज्यूस आणि जाम नक्की कुणाकुणाला दिला जातोय ?.,
पाचगणी प्रतिनिधी
मौजे भोसे पाचगणी मेन रोड लगत मालाज फॅक्टरी समोरील नैसर्गिक दृष्ट्या जिवंत मजबूत असलेली झाडे ही मालाज फॅक्टरीच्या पार्किंगला अडथळा निर्माण होत असल्याने दोन वर्षांपूर्वीची उपविभागीय प्रांत अधिकारी वाई यांच्या रोड लगतच्या झाडे खडासणीच्या आदेशाची नक्कल प्रत दाखवत शासकीय अधिकारांची पत्रकारांची दिशाभूल करत मालाज फॅक्टरीच्या व्यवस्थापनाने वृक्षांची हत्या केली असल्याचे चित्र दिसून येत आहे, इतकच नाही तर मालाज फॅक्टरी च्या पाठीमागे 9 निलगिरीची झाडे ही मुळापासून कापत कररच्य वखारीला विकली असल्याचे ही दिसून येत आहे, तर पुढील बाजूस मेन रोड लगत सहा निलगिरींच्या झाडांचे शरीरापासून धडच वेगळे केले असल्याचे दिसून येत आहे अशा एकूण मालाज कंपनीने पंधरा झाडांची हत्या केल्याचे चित्र समोर आले आहे, तक्रारी दाखल असून देखील कुठलाही अधिकारी मालाज फॅक्टरी च्या अवतीभवती देखील फिरत नसताना दिसून येत आहे, एकीकडे जीएसटी आयुक्त हे संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचे गाव खातात तर दुसरीकडे तहसीलदार तलाठी सर्कल प्रांत यांच्या कार्यालयाच्या शेजारीच उभी असलेली कंपनी अक्षरशः झाडांची हत्या करत प्रशासनालाच चॅलेंज करत असल्याचे दिसून येत आहे, नक्की मालाज फॅक्टरीचा ज्यूस आणि जाम कुठल्या कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळत आहे,का? याचा शोध घेणे गरजेचे ठरणार आहे, उपविभागीय प्रांत अधिकारी वाई हे मालाज फॅक्टरीच्या मनमानी कारभारावरती कारवाई करणार का ? शासनाच्या दोन वर्षांपूर्वीची झाडांची फांदी खडसावण्याचे पत्र घेऊन झाडांची हत्या करणाऱ्या कंपनी वरती व कंपनीतर्फे अर्ज करणाऱ्या व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्याचे पत्र उपविभागीय प्रांताधिकारी देणार का ? व संबंधित झाडांचा पंचनामा करून प्रांत अधिकारी गुन्हा दाखल करणार का ? याकडे संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे,

