मोजे भोसे हद्दीतील मालास फॅक्टरी मध्ये वृक्षतोड प्रांतांचा आदेश आहे, असे सांगून अडथळा निर्माण न करणारे झाड पार्किंग साठी मालाज कंपनीने तोडले कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याची अनमोल कांबळे यांची मागणी.,



मोजे भोसे हद्दीतील मालास फॅक्टरी मध्ये वृक्षतोड प्रांतांचा आदेश आहे, असे सांगून अडथळा निर्माण न करणारे झाड पार्किंग साठी मालाज कंपनीने तोडले कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याची अनमोल कांबळे यांची मागणी.,

पाचगणी प्रतिनिधी

महाबळेश्वर तालुका हा इको सेन्सिटिव्ह झोन असून अत्यंत संवेदनशील तालुका मानला जातो परंतु काही दिवसांपासून अधिकाऱ्यांमुळे तालुक्याला ग्रहण चालू झाले आहे की काय? असा असणारा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यातच आता नुकताच मलाज फॅक्टरीमध्ये अडथळा निर्माण न होणारे झाड अडथळा निर्माण करत आहे असे कागदपत्र रंगवून अडथळा निर्माण न होणारे झाड कंपनीच्या पार्किंग साठी तोडायची परवानगी उपविभागीय अधिकारी वाई प्रांत यांनी दिली असल्याचे मलाज फॅक्टरी च्या कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे खरतर महाबळेश्वर तालुका हा पर्यावरण पूरक व पर्यावरण प्रेमी तालुका असून या पर्यावरणाची हत्या करण्याचं काम प्रस्थापित यंत्रणे कडूनच चालू असल्याचे दिसून येत आहे काही दिवसांपूर्वीच मौजे पाचगणी येथील सर्वे 89/4 मध्ये राहण्याकरिता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोर मारण्याची परवानगी ही जिल्हाधिकाऱ्यांची असल्याने बांधकाम करण्याच्या पूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून संबंधित धन दांडग्याने बोर मारण्याचे काम पूर्ण करून घेतले आहे, परंतु त्या संदर्भात महसूल यंत्रणेकडून तलाठी यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा पंचनामा अथवा कारवाई करण्याचे धोरण राबवले जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, त्यातच आता पाऊस येत आहे म्हणून वाढलेल्या झाडांच्या फांद्या खडसायच्या आहेत असे सांगून उपविभागीय अधिकारी वाई प्रांत यांच्याकडून झाडांचे एन्काऊंटर करण्याची प्रमाणपत्र मालाज कंपनीनेमिळवले आहे की काय? असा असणारा प्रश्न उपस्थित झाला असून या संदर्भात आपण जिल्हाधिकारी सातारा इन्व्हरमेंट कमिटी नवी दिल्ली पुणे यांच्याकडे कंपनी विरोधात व खोटी बनावट परवानगी तयार केल्याबाबत उपविभागीय अधिकारी वाई प्रांत यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असून सदर मालाज कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा ही प्रामुख्याने मागणी राहणार आहे असे अनमोल कांबळे यांनी सांगितले,