येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार मकरंद आबा पाटील विरुद्ध विराज भैया शिंदे रंगत पाहायला मिळणार का? झाडाणी प्रकरणात विराज भैय्यां शिंदेंच्या पुराव्यानंतर अनेक प्रकरणात आमदार मकरंद आबा पाटलांची नावे, कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कामातील घोटाळ्या सह इतर योजनेच्या घोटाळ्यांमध्ये हात असल्याची शंका?
प्रतिनिधी
अनमोल कांबळे
वाई महाबळेश्वर खंडाळा मतदार संघातील आमदार मकरंद आबा पाटील यांचे नाव महाबळेश्वर तालुक्यातील झाडांणी गाव बळकवणाऱ्या गुजरात राज्याचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्या प्रकरणांमध्ये आले असल्याने व या सर्व गोष्टींचा भांडाफोड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व वाई महाबळेश्वर खंडाळ्याचे युवा नेते विराज भैया शिंदे यांनी केला असल्याने मकरंद आबा पाटील यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांचा हात अनेक प्रकरणांमध्ये आहे का? असा देखील प्रश्न आता उपस्थित झाला असल्याचे पाहायला मिळत आहे, तालुक्यातील मतदारांच्या माहितीनुसार आमदार मकरंद आबा पाटील हे सर्वसामान्य मतदाराला भेटत नाहीत, केवळ बगलबच्चानाच तालुक्यामध्ये भेटतात केवळ बगलबच्चनचीच कामे करतात त्याच प्रतीक है महाबळेश्वर तालुक्यामध्ये दिसत आहे रस्त्यांची कामे दुरुस्ती गटर बांधणे काँक्रिटीकरण करणे दिवाबत्ती लावणे ही कामे सुशिक्षित ठेकेदारांना न देता आमदार गटाच्या ठराविक बगलबच्चानाच दिली जात असल्याने रस्त्यांचे उध्वस्थीकरण व निष्कृष्ट दर्जाची कामे महाबळेश्वर तालुक्याला लाभली जात असल्याचे दिसून येत आहेत, त्यातच इतके दिवस हा सर्व प्रकार दाबला जात असल्याने अचानक रित्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज भैया शिंदे यांनी आमदार मकरंद आबा पाटलांच्या कारभाराचा भांडा फोड केला असल्याने आमदारांचा खरा चेहरा जनतेसमोर येऊन ठेपला असल्याचे दिसून येत आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा खेळ अनेक वर्ष आमदार मकरंद आबा पाटलांनी चालवला असल्याची चर्चा सध्या मतदारसंघांमध्ये जोरात चालू आहे ज्या गावांमध्ये वस्तीच नाही त्या गावांमध्ये शासकीय फंडाची उधळपट्टी कशासाठी? केली गेली असा देखील प्रश्न आता उपस्थित राहिला असल्याचे दिसून येत आहे, त्यातच काही महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची रंगत वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघांमध्ये जोरात वाढत असल्याचे दिसून येत असून, आमदार मकरंद आबा पाटील यांच्याविरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज भैया शिंदे निवडणूक लढवणार का? असा देखील प्रश्न उपस्थित झाला असल्याने मतदारसंघातील जनतेला पडलेला असून हे बघन गांभीर्याचे ठरणार आहे, वाई महाबळेश्वर खंडाळा मतदार संघात शासकीय योजनांची चौकशी होऊन बोगस ठेकेदारांवरती कारवाई होणार का? की पुन्हा कारवाईची प्रतीक्षाच राहणार,

