पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर पर्यटन महोत्सव म्हणजे केवळ बंडलबाजी पणा मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये तक्रारींची निर्मूलन करण्या ऐवजी सजावटीचे निर्मूलन करणारे महोत्सव पर्यटनमंत्र्यांनी बंद कराव, अन्यथा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवू अनमोल कांबळे



महाबळेश्वर प्रतिनिधी

राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांच्या जन्मभूमीत महाबळेश्वर मध्ये पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर महोत्सव साजरा करण्याचे धोरण येत्या २७ मे ते २८ मे २०२३ / रोजी महाबळेश्वर या ठिकाणी साजरा करण्याचे धोरण आखलेले असून, या महोत्सवाच्या सुरुवातीलाच विरोध होताना दिसत आहे, आधी तक्रारींची निर्मूलन करा नंतर महोत्सव आयोजित करा मुख्यमंत्री जबाब दो पर्यटन मंत्री जवाब दो, पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन (१५) वा मजला मुंबई या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावलेला आहे, असे आमच्या निदर्शनास आलेले आहे अशी चर्चा देखील चालू आहे, अधिकारी मनमानी कारभार करत आहेत, पर्यटन संचालनालय मध्ये मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत संचालनालयाचे संचालक हे स्वतः श्रेष्ठ असल्याचे चित्र बनवत आहेत, संचालक हे केवळ एडवर्टाइजिंग मध्ये व्यस्त असतात व इतकच काय तर बेकायदेशीरित्या धोम बलकवडी धरणाला हानी असणाऱ्या पॅराग्लायडिंग सारख्या गंभीर खेळा संदर्भातील काही मिनिटात लाखो रुपये कमवून देणाऱ्या लोकांनाच भेटतात, या खेळाकरिता सह संचालकांना घेऊन मीटिंग आयोजित करतात, आणि मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातील लोकांच्या तक्रारी व त्यांनी भेटाय दिलेली चीट्टी फेकून देतात, हा जर का मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सन्मान असेल तर या सन्मानाचा आम्ही निषेध करतो, त्यांनी आयोजित केलेल्या महोत्सवाचा निषेध करतो त्यांचा निषेध करतो पर्यटनमंत्र्यांचा निषेध करतो मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाचा निषेध करतो असे अनमोल कांबळे यांनी सांगितले, मुख्यमंत्र्यांनी तालुक्यामध्ये महाबळेश्वर महोत्सव भरवण्याच्या अगोदर तालुक्यातील भूमिपुत्रांच्या भावना समजून घ्याव्यात, आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की ते खरं असतं का ? हे देखील त्यांनी एकदा तपासून घ्यावं मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता तालुक्यातील कामे योग्य पद्धतीने होतील असे वाटले होते परंतु मागचं तेच पुढे होतं की काय? अशी असणारी परिस्थिती आता महाबळेश्वर तालुक्यामध्ये उद्भवलेली आहे विकास कोणाचा झाला तक्रारींची निर्मूलन कुणाचे झाले हे एकदा मुख्यमंत्र्यांनी सांगावे एका तरी तक्रारीचे निर्मूलन झाले का? महाबळेश्वर मध्ये भूमिपुत्रांच्या असणारे स्टॉल काढून फेकण्याची वेळ भूमिपुत्रांवरती आली किरण शिंदे तो लढा देत आहेत, आणि धनदांडग्यांनी उभारलेल्या इमारती पाडण्याची ऑर्डर असताना सुद्धा यंत्रणा त्यांना हात देखील लावत नाही असे का, ? हाताची घडी आणि तोंडावरती बोट घेऊन यंत्रणा का गप्प बसलेली आहे, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, आधी तक्रारींची निर्मूलन करा नंतरच पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन महोत्सव महाबळेश्वर मध्ये साजरा करा अन्यथा काळे झेंडे दाखवून यांचा निषेध करू असे अनमोल कांबळे यांनी सांगितले,