रॉयल्टी नसताना महाराष्ट्र शासनाचा सिम्बॉल लावून विनापरवाना वाई मध्ये दिवसा ढवळ्या मुरमाची वाहतूक सुरूच तहसील महसूल विभागाचा स्थानिक गाडी मालकांना रॉयल्टी असताना त्रास मात्र माफियांकडे कानाडोळा..?



प्रतिनिधी वाई

रॉयल्टी नसताना महाराष्ट्र शासनाचा सिम्बॉल लावून विनापरवाना वाई मध्ये दिवसा ढवळ्या मुरमाची वाहतूक सुरूच तहसील महसूल विभागाचा स्थानिक गाडी मालकांना रॉयल्टी असताना त्रास मात्र माफियांकडे कानाडोळा.

गेल्या अनेक दिवसांपासून वाई पाचगणी महाबळेश्वर परिसरामध्ये तहसीलदार महसूल विभागामार्फत मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमे अंतर्गत तहसीलदार तलाठी व मंडलाधिकारी यांच्या माध्यमातून गौण खनिज वाहतूक करणाऱ्या गाडी मालकांकडे रॉयल्टी नसल्यास कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे परंतु काही ठिकाणी रॉयल्टी असताना देखील जाणीवपूर्वक कारवाई झाल्याचे देखील निष्पन्न झाले आहे या असल्या कारवायांमुळे शासन यंत्रणेमधला महसूल विभागातला भ्रष्टाचार चव्हाट्यावरती येत असल्याचे दिसून आले आहे आता मात्र चक्क वाई परिसरामध्ये शासकीय काम सुरू आहे असे सांगून गौण खनिज वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरती महाराष्ट्र शासनाचा सिम्बॉल लावून विनापरवाना रॉयल्टी न भरता दिवसाढवळ्या मुरूम वाळूची वाहतूक करण्यात येत अल्याचे दिसून आले आहे त्यानंतर स्थानिकांनी गाडी पकडून दिल्यानंतर वाई तहसीलदार यांनी अक्षरशा कानाडोळा करत सदरचे काम हे शासकीय योजने अंतर्गत सुरु आहे असे सांगत महाराष्ट्र शासनाचा सिम्बॉल वापरणाऱ्या व बेकायदेशीर मुरमाची वाहतूक करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले असल्याचे दिसून आले आहे म्हणजे धनदांडग्या महाराष्ट्र शासनाचा सिम्बॉल वापरून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या माफियांना एक न्याय आणि सर्वसामान्य स्थानिक वाहन चालकांना एक न्याय असे का? असा असणारा प्रश्न स्थानिक गाडी मालकांनी उपस्थित केला असल्याने जिल्हाधिकारी या सर्व गोष्टींवरची काय निर्णय घेणार हे बघणे गांभीर्यचे ठरणार आहे.