मौजे भोसे ता: महाबळेश्वर येथील गट नंबर २६/अ ५ / मध्ये पुणे येथील लँड माफिया कडून कुठलीही प्रशासकीय परवानगी नसताना दिवसाढवळ्या विहिरीचे खोदकाम सुरूच माफियाला मात्र ‌ महाबळेश्वर तहसील कार्यालयाचे अभय असल्याची ? चर्चा तक्रारी करूनही तलाठी मोहिते यांची कारवाईला टाळाटाळ तलाठी कुणाच्या भीतीच्या छायेखाली? जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आत्ता स्वतः लक्ष घालण्याची गरज..!



प्रतिनिधी अनमोल कांबळे

मौजे भोसे ता: महाबळेश्वर येथील गट नंबर २६/अ ५ / मध्ये पुणे येथील लँड माफिया कडून कुठलीही प्रशासकीय परवानगी नसताना दिवसाढवळ्या विहिरीचे खोदकाम सुरूच माफियाला मात्र ‌ महाबळेश्वर तहसील कार्यालयाचे अभय असल्याची ? चर्चा तक्रारी करूनही तलाठी मोहिते यांची कारवाईला टाळाटाळ तलाठी कुणाच्या भीतीच्या छायेखाली? जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आत्ता स्वतः लक्ष घालण्याची गरज.

काही दिवसांपूर्वी महाबळेश्वरच्या तहसीलदार कार्यालयामार्फत पाचगणी महाबळेश्वर परिसरातील अनाधिकृत बांधकामावरती हातोडा उचलला गेला होता यामध्ये अनेक जणांची बेकायदेशीर रित्या उभारलेली घरे ही तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली उध्वस्त करण्यात आली होती यामध्ये कडक कारवाई आहे असे भासवून लोकांची दिशाभूल करत असणाऱ्या महाबळेश्वर तहसील कार्यालयाचा आता भोंगळ कारभार समोर आला आहे, एकीकडे तहसील कार्यालयामार्फत पोलीस स्टेशनला पत्र देऊन जो आपली पोलखोल करेल त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल करा असे महाबळेश्वर तहसीलदार यांच्याकडून सांगण्यात येते तर दुसरीकडे पुणे येथे लँड माफीया असणाऱ्या एका माफिया कडून महाबळेश्वर पाचगणी मेन रोड लगत मालाज फॅक्टरी समोरील गट नंबर २६/५/ असणाऱ्या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ८०० फूट खोल विहीर खोदत मे खडा तो सरकार से बडा हे जणू चॅलेंज या माफियाने महसूल प्रशासनाला दिले असून महाबळेश्वर तहसील कार्यालयातील महसूल प्रशासन मात्र मूग गिळून गप्प का बसले आहे ? असा असणारा प्रश्न उपस्थित झाला आहे येरी दिवशी सर्वसामान्यांवरती कारवाईचा भडगाव उचलणाऱ्या तहसीलदार आता कुठे आहेत? असा असणारा प्रश्न उपस्थित झाला असून पूर्वी केलेल्या कारवाया या श्रीमंतांना भीती दाखवण्यासाठी केल्या गेल्या होत्या की काय? याची देखील चर्चा आता दबक्या आवाजामध्ये महाबळेश्वर पाचगणी परिसरामध्ये सुरू झाली असून सातारा जिल्ह्याचे नव निर्वाचित जिल्हाधिकारी संतोष पाटील स्वतः तालुका उध्वस्त होत असताना लक्ष घालून धनदांडग्यांन वरती कारवाई करणार का? की पुन्हा एकदा महाबळेश्वर तहसील कार्यालयामध्ये दबक्या आवाजात लपलेल्या एजंटांना सहकार्य करणार ? हे बघणं गांभीर्याचे ठरणार आहे.