वनवे तलाठी यांच्या पंचनाम्याने महसूल यंत्रणेला खडबडून जाग महाबळेश्वर तहसीलदारांची मौजे आमशी येथील सर्वे नंबर 20/1/22/2/ मध्ये दंडात्मक कारवाई तर इतर तलाठ्यांनी देखील वनवे तलाठी यांचा आदर्श घ्यावा,



महाबळेश्वर प्रतिनिधी

मौजे आमशी येथील सर्वे नंबर 20/1/22/2/ या सर्वे नंबर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन केले असून वंचित बहुजन आघाडीचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष उत्तम भालेराव यांनी या विषयी आवाज उठवल्यानंतर व तक्रारी केल्यानंतर त्यांच्या तक्रारीला यश येत व वनवे तलाठी यांनी आपला महसूल यंत्रणेचा बाणा दाखवत वस्तुस्थितीचा पंचनामा केल्यानंतर महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांनी आपला तेजस्वी बाणा दाखवत संबंधिताला थेट महाबळेश्वर तापोळा घाट दाखवत संबंधितावरती दंडात्मक कारवाई केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे या कारवाईमुळे महाबळेश्वर तालुक्यातून महसूल यंत्रणेची झुकलेली मान वनवे तलाठी यांच्या पंचनामामुळे काही अंशतः उंचावलेली दिसत आहे तलाठी यांनी प्रखरपणे पंचनामा केला नसता आणि पर्यावरण प्रेमी उत्तम भालेराव यांनी आवाज उठवला नसता तर मात्र संबंधित धनदांडग्याला दंड हा झालाच नसता आणि पर्यावरणाचा बळी हा गेला असता वनवे तलाठी यांचे कार्य हे अत्यंत आदर्श घेण्यासारखे कार्य आहे उल्लेखनीय कामगिरी गेल्या दहा ते पंधरा वर्षात या तालुक्यांमध्ये वनवे यांनी करून दाखवलेली आहे पाचगणी मध्ये तलाठी असताना देखील घरोघरी जाऊन शासनाची संजय गांधी निराधार योजना ही खऱ्या अर्थाने खेड्यापाड्यांमध्ये अत्यंत प्रभावशाली प्रकारे वनवे तलाठी यांनी राबवली घरोघरी जाऊन विधवा महिलांचे फॉर्म भरून घेणे व त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणे माहिती देणे शालेय विद्यार्थ्यांना वेळेत दाखले देणे असे समाहितार्थ कार्य वनवे यांनी करून दाखवलेले आहे त्यांचा आदर्श हा इतर तलाठी सर्कल महसूल विभाग यांनी घेणे गरजेचे आहे काही तलाठी हे केवळ हवेत पंचनामे करून आमच्या हातात काही नाही असे सांगून आपली जबाबदारी झटकून शासनाचा मिळालेला आयता पगार घेण्याचे स्वप्न पाहतात त्या तलाठ्यांनी आता वनवे यांचा आदर्श घेण्याची वेळ आलेली आहे इतकच काय तर वनवे तलाठी यांची आता बदली झाल्यास तालुक्यातील एक प्रामाणिक अधिकारी महसूल यंत्रणेतून गहाळ होणार असल्याने लोकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे पाहिला मिळत आहे वनवे यांचा आदर्श मात्र कायमस्वरूपी या तालुक्यामध्ये राहणार आहे, व त्यांच्या पुढील वाटचालीस तालुक्यातील लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव देखील त्यांच्या कार्या वरती होत आहे याचा आदर्श घेणे ही इतर तलाठ्यांना काळाची गरज आहे….