महाबळेश्वर प्रतिनिधी
सतीश देवकर
इथे पत्रकारांला बोलू देत नाहीत इथे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ देत नाहीत म्हणून आता मनामध्ये असा विचार यवू लागला आहे की क्रांतिकऱ्यांच्या जिल्ह्यातले भूमिपुत्र आपण आहोत का..? असा असणारा प्रश्न उपलब्ध झालेला आहे खरंतर सातारा जिल्हा हा क्रांतिकारांचा जिल्हा आहे या जिल्ह्याने अनेक क्रांतिकार जन्माला घातले आहेत परंतु काही दिवसांचा कार्यकाळ बघता एकीकडे पत्रकारांचा मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी यंत्रणा जन्माला आलेली आहे तर दुसरीकडे पत्रकारांला लेखकाला संपवण्याकरिता आणि स्वतःचं काम काढून घेण्याकरिता खंडणी सारखे गुन्ह्यांचा आधार घेऊन व स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून यंत्रणा कार्यरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे प्रवाह विरुद्ध बंड पुकारून लोकांच्या हिताकरिता एखादा पाऊल उचललं तर त्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरावरती हल्ला करण्याचे काम हित जन्माला आलेली वृत्ती करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ही वृत्ती थांबली गेली पाहिजे आणि जर काही वृत्ती थांबवायची असेल तर इथे असणाऱ्या प्रस्थापित यंत्रणेने भक्कम होण्याचं कार्य हे समाजापुढे आदर्श पणे दाखवून दिल गेल पाहिजे खरंतर ही यंत्रणा स्वतःही काही करत नाही आणि समाजातील घटकांना चाललेल्या चुकीच्या कार्याबद्दल आवाज ही उठू देत नाही अशी असणारी परिस्थिती आता या जिल्ह्याची झालेली आहे, आणि ही जर का परिस्थिती बदलायची असेल तर प्रतिष्ठेचं सोंग घेतलेल्या त्या टाय कोट घालणाऱ्याचं न ऐकता सर्वसामान्यांच्या व्यथा या यंत्रणेने ऐकून घेतल्या पाहिजेत मांडून घेतल्या पाहिजेत तर आणि तरच या क्रांतिकारांच्या भूमीमध्ये पुन्हा एकदा नव्याने क्रांती उभी राहिल्याशिवाय राहणार नाही असे अनमोल कांबळे यांनी सांगितलं,

