पाचगणी नगरपालिका निवडणुकीमध्ये कुणाचा पॅनल बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लक्ष्मी कराडकर स्वातंत्र गट की शेखर कासुर्डे आमदार गट .!



पांचगणी प्रतिनिधी

पाचगणी नगरपालिका निवडणुकीमध्ये कुणाचा पॅनल बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लक्ष्मी कराडकर स्वातंत्र गट की शेखर कासुर्डे आमदार गट

सात वर्षानंतर येऊन ठेपलेल्या पंचवार्षिक पाचगणी नगरपालिका निवडणुकीमध्ये आता कराडकर विरुद्ध कासुर्डे असा सामना पाहायला मिळणार आहे, राष्ट्रवादी आमदार गटाचे पाचगणी शहराचे सर्वेसर्वा राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी या निवडणुकीमध्ये एससी आरक्षण असल्याने आपली सत्ता आणण्याची पूर्ण तयारी केली असून पक्षातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना पूर्ण ताकतीने लढा आणि जिंका व सत्ता आणा अशा आशयाच्या सूचना केल्या असल्याची चर्चा शहरात जोरात सुरू असून दुसरीकडे स्वबळाचा नारा देत सत्ता आणण्याची युक्ती पाचगणी नगरीच्या नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर कशाप्रकारे वापरतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे, नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांच्या बालेकिल्लातच कराडकर यांचे चार नगरसेवक राष्ट्रवादीचे नेते शेखर कासुर्डे यांनी आपल्याकडे घेण्यात यश मिळवले होते मात्र आता त्याच कराडकर यांच्या बालेकिल्ल्यातून कराडकर यांच्याशी गद्दारी करणारे नगरसेवक निवडून येणार का? जनता पुन्हा एकदा नव्याने त्याच चेहऱ्यांना निवडून देणार का? की नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे, कराडकर यांचे सिद्धार्थ नगर शाहूनगर कॉलनी जुना पावर हाऊस वाल्मीक नगर या भागात मोठ्या प्रमाणात वर्चस्व असल्याने मतदारांशी थेट संबंध देखील आहेत तर दुसरीकडे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण एससी असल्याने इकडे इच्छुकांची मात्र चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांपैकी अध्यक्ष पदाच्या रेसमध्ये आठ ते दहा जण असून माजी उपनगराध्यक्ष संतोष कांबळे सह सामाजिक कार्यकर्ते अनमोल कांबळे देखील अध्यक्ष पदाच्या रेस मध्ये असून कराडकर यांच्या पॅनल मधून संधी मिळाल्यास नगराध्यक्ष पद लढवू असे संतोष कांबळे अनमोल कांबळे यांच्याकडून सांगण्यात येत असून दुसरीकडे राष्ट्रवादी आमदार गटाकडून शेखर कासुर्डे नक्की कुणाला संधी देणार हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे या सर्व गोष्टीचा सारांश पाहता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कराडकर विरुद्ध कासुर्डे असा रंगत सामना रंगणार असून नक्की नगराध्यक्ष पदाची बाजी कोणता पॅनल मारणार हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.