पाचगणी शहराच्या विकासाला साथ द्या म्हणत लक्ष्मी कराडकर यांची प्रचारात आघाडी..!



प्रतिनिधी पांचगणी 

पाचगणी नगरपालिका निवडणूक जाहीर होताच पाचगणी शहरांमध्ये दोन पॅनल ची टक्कर होणार हे मात्र निश्चित असताना कराडकरांन समोर विरोधकांची धाकधूक वाढली असल्याचे चित्र शहरामध्ये पाहायला मिळत आहे लक्ष्मी कराडकर यांच्याकडे पाचगणी शहराचं नवीन रोल मॉडेल तयार असून पर्यटन रोजगार स्वच्छता रस्ते पाणी शिक्षण आरोग्य या प्रश्नांसह अन्य प्रश्नांवरती भर देणार असल्याचे लक्ष्मी कराडकर यांनी सांगितले, कराडकर म्हणाल्या मी माझ्या आयुष्याच्या कार्यकाळातली 25 वर्ष राजकारणाकरिता व समाजकारणाकरिता अर्पण केली असून त्याची पोचपावती म्हणून या निवडणुकीमध्ये जनता भरघोस मतांनी माझ्या सर्व उमेदवारांना विजयी करत या निवडणुकीमध्ये विकासाच्या विरोधकांना जागा दाखवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा आत्मविश्वास सामान्य जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या मनात आहे, 90% विकास आणि दहा टक्के राजकारण हे धोरण आम्ही आमच्या आघाडीच्या माध्यमातून या शहरांमध्ये आजपर्यंत राबवत आलो आहोत शहराच्या माध्यमातून व जनतेच्या माध्यमातून प्रचारावेळी मिळणारा अनमोल प्रतिसाद अनुभवत असताना जनतेप्रती मन भरून येत आहे, कारण मी लोकांच्या घराघरातील आणि मनामनातील विकासाची लक्ष्मी आहे आणि याचीच पोचपावती लोकांनी माझ्यावरती टाकलेला विश्वास आहे आणि हा विश्वास आणखी भक्कम करण्याकरिता मतदार राजा येत्या तीन तारखेला आपल्या मतदानातून विकासाला विजय करत विकासाला विरोध करणाऱ्यांना जागा दाखवेल पाचगणीचा सर्वांगीण विकास हाच लक्ष्मीचा ध्यास आपल्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानी निवडून द्या आणि विकासाला साथ द्या असे लक्ष्मी कराडकर यांनी सांगितले आहे या अनुषंगाने मतदारांन कडून माहिती घेतली असता कराडकर यांची सत्ता पाचगणी शहराला दिल्लीच्या तक्त्यापर्यंत घेऊन जाऊ शकते असे मत मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे..