*प्रतिनिधी*
*अनमोल कांबळे*
महाबळेश्वर बचाव आघाडीचे प्रमुख किरण शिंदे यांनी खळबळ जनक वक्तव्य करून सर्वांच्या भवळ्या उंचावण्याचं काम केलं आहे दोन दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी तहसीलदार महाबळेश्वर यांना निवेदन दिले निवेदनामध्ये असे म्हटले आहे की महाबळेश्वर मधील इतिहासकालीन पॉईंट ला असणारे नावे ही बदलावी आणि हे निवेदन देताच महाबळेश्वर मधील पुन्हा एकदा पॉईंट वरील नामांतराचा वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही? याचे कारण निवेदन देताच अनेक संघटनांनी या निवेदनाला विरोध करत किरण शिंदे यांचे नेतृत्वाखाली महाबळेश्वर बचाव आघाडीच्या माध्यमातून जी इतिहासकालीन नावे आहेत ती तशीच ठेवा व बाहेरून येऊन महाबळेश्वर तालुक्यामध्ये कटकारस्थान रचनाऱ्यांना महाबळेश्वरच्या वेशेवरच थांबवा अन्यथा होणाऱ्या सर्व परिणामास प्रशासन हे स्वतः जबाबदार असेल असे किरण शिंदे यांनी सांगितले महाबळेश्वर पाचगणीतील पॉईंट हे इतिहासकालीन पॉईंट आहेत यातील प्रत्येक पॉईंटला एक इतिहास आहे आणि बाहेरून येऊन जर का हा इतिहास बदलण्याचे कटकारस्थान कोण रचत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचं काम महाबळेश्वर बच्छाव आघाडीच्या माध्यमातून केले जाईल आघाडीचे प्रमुख किरण शिंदे यांनी सांगितले त्याच प्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला आता काहीच काम राहिले नसून व आपल्या पाठीमागे कोणीही येत नसून वाद पेटवून स्वतःला या प्रकरणांमध्ये मोठे बनवण्याचे काम हे काही जणांनी हातामध्ये घेतला आहे आणि म्हणून त्यांना आता महाबळेश्वर दिसत आहे परंतु त्यांच्या डोक्यामध्ये शिजत असलेली खिचडी ही महाबळेश्वर तालुक्यामध्ये आम्ही शिजू देणार नाही असे किरण शिंदे यांनी सांगितले,

