मौजे कासवंड येथील कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या पवार तलाठी यांच्या वरती आठ दिवसात कारवाई करून तात्काळ सक्तीच्या रजेवरती पाठवा व पाचगणी शहराला कायमस्वरूपी सर्कल द्या अन्यथा सर्कल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू अनमोल कांबळे…



पाचगणी प्रतिनिधी

मौजे भिलार कासवंडयेथील कार्यरत असणारे पवार तलाठी हे आपल्या विविध मनमानी कारभारामुळे चर्चेमध्ये असतात त्यातच काही दिवसांपूर्वी त्यांनी कलेक्शन साठी ठेवलेला त्यांचा हस्तक असणारा विशाल व तलाठी त्यांच्यात वादावादी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे माजी वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या वाघमोडे साहेबांचे पाकीट कोण घेऊन येणार याच्यामुळे तलाठी व त्यांच्या हस्तकांमध्ये वादावादी झाल्याची चर्चा संपूर्ण परिसरामध्ये चालू आहे तहसीलदार महाबळेश्वर यांचे पत्र असताना की तलाठ्यांच्या हाताखाली कोतवाल सोडलं तर कुणीही कार्यालयामध्ये कार्यरत नाही असे असताना अचानक कार्यालयाचा संपूर्ण कारभार हा तलाठी यांनी नेमलेल्या त्यांच्या हस्तकांच्या हातामध्ये असल्याचे चित्र दिसून येत आहे यातूनच वरिष्ठ अधिकाऱ्याला शनिवार आणि रविवार कोल्हापूर सांगली या भागांमध्ये सोडायला कोण जाणार व वाघमोडे यांनी जी मीटिंग रविवारी बोलवलेली होती त्या मिटींगला उपस्थित कुणी राहायचं याच्यामुळेच पवार तलाठी व त्यांच्या हस्तकामध्ये वादावादी झाल्याची धक्कादायक घटना व चर्चा संपूर्ण परिसरात चालू असून ती समोर आली आहे , व अनमोल कांबळे यांनी हा मुद्दा हातामध्ये घेतला आहे, वाघमोडे नावाचा जो अधिकारी आहे तो कोण आहे हे तहसीलदार महाबळेश्वर यांनी स्पष्ट करावं त्याने केलेल्या बेकायदेशीर उत्खननाचा पंचनामा ड्रोन च्या माध्यमातून न करता त्याचा पंचनामा केवळ एका साध्या कागदामध्ये का केला गेला ? हे तहसीलदार यांनी स्पष्ट करावं इथे पूर्णपणे वाघमोडे यांना सहकार्य करण्याचे काम पवार तलाठी यांनी केलेले असल्याचे दिसून येत आहे पंचनाम्याला फोटो का जोडले नाहीत? व पंचनाम्या वरती जे पंच नेमले गेले त्या पंचांच्या खोट्या सह्या तलाठी यांनी कोऱ्या कागदावरती का घेतल्या? पंचाचा स्वतंत्र जबाब का नाही घेतला गेला?हे ही तहसीलदार यांनी स्पष्ट करावं पाचगणी सज्जाला कायमस्वरूपी मंडलअधिकारी नेमावा वाघमोडे यांचा फेर पंचनामा ड्रोन च्या माध्यमातून करावा, दारूचा व्यापारी असणारा विल्सनपोल आणि समशा रजांनी यांचं काय झालं ? हे ही तहसीलदारांनी स्पष्ट करावे सध्याचे मंडलअधिकारी हे तारखांन मध्ये व्यस्त आहेत ज्या कार्यालयामध्ये कोण ढुंकूनही पाहत नव्हतं त्या कार्यालयामध्ये आज कोर्ट तयार झालेले आहे, रोज कार्यालयामध्ये तारखा चालू आहेत त्या कुठल्या तारखा आहेत मिळकत धारकांना का इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबई पुणे गुजरात वरून का बोलावले जाते हे तहसीलदारांनी स्पष्ट करावे ? येत्या आठ दिवसांमध्ये स्पष्टीकरण द्या आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा येथे आठ दिवसांमध्ये पाचगणी शहराच्या तलाठी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करून प्रशासनाला जाग करण्याचं काम केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे अनमोल कांबळे यांनी सांगितले,