पाचगणी जीवन प्राधिकरण विभागाकडून नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या गैरसोयी बाबत माजी नगरसेवक हॅन्ड्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिंनाक 20/2/2022 रोजी पाचगणी येथे जन आक्रोश मोर्चा
प्रतिनिधी
अनमोल कांबळे
सातत्याने आपल्या वादळी संघर्षाने चर्चेत असणारे पाचगणी नगरपालिकेचे माजी नगरसेवक हॅन्ड्री जोसेफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणखी एक क्रांतीचा लढा उचलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पाचगणी शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जीवन प्रधिकरण विभागाकडून पाण्याची टंचाई नागरिकांना भासत असल्याने व त्या टंचाई वरती कुठल्याही प्रकारची विभागाकडून ठोस उपाय योजना होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि म्हणून आता हा संघर्षमय लढा नागरिक विरुद्ध जीवन प्राधिकरण विभाग असा चालू झाला असून या लढ्यात संघर्षाच्या क्रांतीची मशाल पेटवून क्रांती करण्याचे धोरण पाचगणी नगरपालिकेचे माजी नगरसेवक हॅन्ड्री जोसेफ व रंजन कांबळे गौतम गंगावणे व त्यांचे सहकार्यानी हातामध्ये घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अनेक वर्ष शांत असलेल्या पाचगणी शहरामध्ये अचानकपणे एखादी क्रांती घडते हे सातत्याने पाहायला मिळत आहे, परंतु जीवन प्राधिकरण विभागाचा होणारा मनमानी कारभार नागरिकांना पाण्या वाचून होणारा त्रास याच्याविरुद्ध माजी नगरसेवक हॅन्ड्री जोसेफ यांनी आज रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे, जोसेफ म्हणाले नगरसेवक नेते केवळ इलेक्शन पुरतेच लोकांच्या दारामध्ये येतात लोकांना पैसे देऊन मते विकत घेतात आणि पुन्हा तिकडे फिरकत ही नाहीत मी लोकांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून दिलेल आहे मी रस्त्यावरतीच आहे माझ्याकडे कोणीही कधीही या आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरायला तयार आहेत मी प्रतिष्ठेपाई घरात लपून बसणारा कार्यकर्ता नाही तर मी पॅंथर चा लढवय्य कार्यकर्ता आहे, रंजन कांबळे म्हणाले समाजसेवा म्हणजे केवळ इलेक्शन पुरती नसती निवडून यायचं आणि सफेद कपडे घालून फिरायच असे नाही तर लोकांना होणारा त्रास हा तुम्हाला अनुभवता आला पाहिजे पद असो अथवा नसो परंतु लोकांसाठी अहोरात्र तुम्ही रस्त्यावरती उतरला पाहिजे हा मोर्चा जीवन प्रधिकरणाच्या धोरणांच्या विरोधात असून या धोरणांची विल्हेवाट लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, तर पुढे जाऊन गौतम गंगावणे म्हणाले मोर्चाला पाचगणी शहरातील नागरिक हे प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत कारण हा सामजिक प्रश्न आहे पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी हा मोर्चा यशस्वीरित्या आम्ही पार पाडणार आहोत आता प्रशासन या विरुद्ध काय भूमिका घेते याकडे पाचगणी शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे,…
